Youth Festival : ओला दुष्काळामुळे साधेपणाने ज्ञानतीर्थ -२०२५ युवक महोत्सवाचे उदघाटन
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालय युवक महोत्सव "ज्ञानतीर्थ २०२५" चे अत्यंत साधेपणाने पुणे येथील एमडॉक चे संचालक रवींद्र पाल सिंगजी याच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये पुणे येथील विलोचे उपाध्यक्ष रवींद्र उटगीकर, श्री व्हायब्रेशन टेकनॉलॉजिएसचे संचालक चेतन डाखोरे, रुरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, नरेंद्र चव्हाण, डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एन. मोरे, नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालन डॉ. राजेश्वर द...









