उस्माननगर l विद्यार्थी मोबाईल , मीडीयाच्या आहारी गेला असून वाचन अत्यल्प झाले आहे. , वाचन माणसाला प्रगल्भ , संयमी , विवेकी बनवते. वाचन माणसाला सर्वांगीण विचार करायला लावते. डॉ. कलांम यांचे विचार वाचून आपण आपले जीवन समृद्ध करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी केले.


:- माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा शासनाच्या निर्देशानूसार वाचन प्रेरणा दिन म्हणून सम्राट अशोक प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना वाचनाचे फायदे हे आयुष्यात महत्वाचे असतात. वाचन केल्याने भविष्यात जडणघडण होते. व मानवाचा विकास होतो. ए.पी. जे. अब्दुल कलाम हे विद्यार्थी प्रिय होते. असे वक्तव्य शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी केली. यावेळी माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळेस जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला.


आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना नितीन लाठकर यांनी माहिती सांगितली. यावेळी शाळेच्या शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सौ.प्रियदर्शिनी चेनपुरकर ( सोनसळे ),देविदास डांगे,मन्मथ केशे, भगवान राक्षसमारे, सिद्धोधन लाठकर, श्रीमती एस.एम.भालेराव ( सोनसळे ), सौ.रोहीनी सोनकांबळे, सौ.शेख नगमा, शकिल सर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.




