करियरनांदेड

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

हिमायतनगर | राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कु. किरण संजय मुनेश्वर हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

एसी प्रवर्गातून भोकर–हिमायतनगर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत तिने सैनिक शाळेच्या प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. कु. किरण मुनेश्वर ही सिरंजनी येथील रहिवासी असून ती सध्या इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आहे. लहान वयातच आईचे छत्र हरपले असतानाही तिने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले. वडील पत्रकार संजय मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अभ्यासात सातत्य ठेवत सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.

किरणच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद केंद्रीय शाळा हाळदा येथील मुख्याध्यापक बालाजी गुट्टे, शिवाजी माने, पत्रकार जयभीम पाटील, माजी सरपंच सुभाष सिलेवाड, भगवान भालेराव, परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, अनिल मादसवार, मारोती वाडेकर, संजय मुनेश्वर, सोपान बोंपीलवार आदींनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button