Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Members of the Vidhan Sabha : राखीव निधी खर्च न करताच विधानसभा सदस्यांनी आपला कार्यकाळ संपविला -NNL

Members of the Vidhan Sabha : राखीव निधी खर्च न करताच विधानसभा सदस्यांनी आपला कार्यकाळ संपविला -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबरला होत आहेत,तर नऊपैकी सहा विधानसभा क्षेत्रांनी बनलेल्या १६ नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा एकाच दिवशी २० नोव्हेंबर रोजी होत आहे. या दोन्ही निवडणूकांमध्ये गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांपेक्षा अधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दोन्ही निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात एकुण २७ लाख ७१ हजार मतदार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. त्यात जवळपास ४० हजार दिव्यांग मतदार असुन दिव्यांगांनी आपले भविष्य ठरविण्यासाठी आजवर मोठ्या संख्येने मतदान केलेले आहे. परंतु लोकसभा सदस्य आणि विधानसभा सदस्यांनी दिव्यांग मतदारांकडे अक्षरशः आजवर दुर्लक्षच केले असल्याचे पहावयास मिळाले आहे. एम्पीलैड्समधील दिव्यांगांचा दरवर्षीचा कमीत कमी ३० लाख ...
Ramesh Chennithala : जनतेचे दिवाळे काढून शिंदे भाजपची दिवाळी – रमेश चेन्नीथला -NNL

Ramesh Chennithala : जनतेचे दिवाळे काढून शिंदे भाजपची दिवाळी – रमेश चेन्नीथला -NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| भाजप शिंदे अजित पवारांच्या शेतकरी विरोधी आणि केंद्राच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. एकीकडे महागाई प्रचंड वाढली असून सोयाबीन,कापूस आणि कांदा या शेतीमालाला रास्त भावही मिळत नाही. शेतकरी, कष्टकरी, गृहिणी यांचे दिवाळं काढून शिंदे भाजपची दिवाळी सुरु आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत वंचित आघाडीचे नेते व राज्याचे माजी मंत्री अनिस अहमद यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत घरवापसी केली. तसेच अंधेरी मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केलेले काँग्रेस नेते मोहसीन हैदर यांनी प्रभारी रमेश चेन्नीथला यांना भेटून आपण अर्ज मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांनी निवडून आणू असे सांगितले. यावेळी माध्यमांशी बोलत...
Bhaubij (Yamadvitiya) : भाऊबीज (यमद्वितीया) -NNL

Bhaubij (Yamadvitiya) : भाऊबीज (यमद्वितीया) -NNL

नांदेड, लेख
या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया.  तिथी: कार्तिक शुद्ध द्वितीया इतिहास: या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले. महत्त्व: अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता ‘यमधर्म’ हिचे पूजन करतात. ‘या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो अन् त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.’ हा दिवस मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जिवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त क...
Organization of state level innovation competition in five groups : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे पाच गटात आयोजन -NNL

Organization of state level innovation competition in five groups : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे पाच गटात आयोजन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तसेच विद्यार्थी, शिक्षक मोलीके यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25 चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात आले आहे. • पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या, सेविका व पर्यवेक्षिका). • प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक). • माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक). • विषय सहायक, विषय साधन व्यक...
First inspection of election expenses : भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 8 नोव्हेंबरला प्रथम तपासणी -NNL

First inspection of election expenses : भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 8 नोव्हेंबरला प्रथम तपासणी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 85-भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी शुक्रवार 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृह भोकर येथे केली जाणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे. अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकां नुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च...
MLA Madhavrao Patil : आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिल्या हिमायतनगरातील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा -NNL

MLA Madhavrao Patil : आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिल्या हिमायतनगरातील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा हदगाव विधानसभा निवडणूक रिंगणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिमायतनगर शहरात ठिकठिकाणी भेटी दिल्या. आमदार जवळगावकर यांचे शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांनी व समर्थक व्यापारी बांधवानी माधवराव पाटील जवळगावकर यांचा शाल व पुष्पहाराने स्वागत व पेढा भरून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी हिमायतनगर शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, बाजार चौक, चौपाटीसह शहरातील सर्व लहान मोठ्या व्यावसायिक दुकानदार तसेच नोकरदार बांधव, छोटे व्यापारी, हातगाडेवाले, फळविक्रेते, यांची आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय...
Grant Puja on the occasion of Diwali : जिज्ञासा अभयसिकेत दिवाळी निमित्त ग्रंथ पूजा ; माजी उपनगराध्यक्ष सूर्यवंशी दिले इव्हेंटर भेट -NNL

Grant Puja on the occasion of Diwali : जिज्ञासा अभयसिकेत दिवाळी निमित्त ग्रंथ पूजा ; माजी उपनगराध्यक्ष सूर्यवंशी दिले इव्हेंटर भेट -NNL

नांदेड, सोशल वर्क
लोहा| जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र लोहा येथे गेल्या आठ वर्षां पासून पत्रकार हरिहर धुतमल ,काशिनाथ शिरसिकर व मित्रपरिवार ना नफा तत्वावर ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी निरपेक्ष भावनेने अभ्यासिका चालवतात.दिवाळी निमित्ताने ग्रंथ पूजा करण्यात आली. विद्युत पुरवठा खंडित झाल्या नंतर विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहून लोह्यातील प्रसिद्ध व्यापारी दशरथ सावकार सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष रामराव सूर्यवंशी, गंगाधर सावकार सूर्यवंशी यांनी इव्हेंटर भेट दिले. जिज्ञासा अभयसिका निरपेक्ष भावनेने गेल्या आठ वर्षा पडून हरिहर धुतमल, काशिनाथ शिरसिकर, पांडुरंग भातलवंडे, प्रकाश जिरेवार, कै. प्रशांत मोटरवार या मित्रपरिवारानी एकत्रित येऊन सुरू केली. आठ वर्षात अभ्यासिकेत अभ्यास करून ६५ विद्यार्थी शासकीय नौकरीला लागले आहेत. डीवायएसपी, डॉक्टर, प्राध्यापक, पोलीस, एसआरपी, सीआरपीएफ, मि...
political ‘rocket..un..tickly : लोहा कंधार “मध्ये दिवाळीत” लक्ष्मी तोटा, सुतळी बॉम्ब’…राजकीय ‘रॉकेट..अन..टिकल्या ‘सूरसुऱ्या’ – NNL

political ‘rocket..un..tickly : लोहा कंधार “मध्ये दिवाळीत” लक्ष्मी तोटा, सुतळी बॉम्ब’…राजकीय ‘रॉकेट..अन..टिकल्या ‘सूरसुऱ्या’ – NNL

नांदेड, राजकीय
लोहा| यंदाची दिवाळी तशी "राजकीय ". निवडणूकीचा काळ त्यातच लोहा कंधार मतदार संघात काँग्रेस च्या "सुतळी बॉम्ब"फुसका ठरला. निवडणूक आली की मुलाखती घेतात अन प्रचार दुसऱ्या पक्षाचा करतात.गेल्या चाळीस वर्षा पासून ",शिवसेनेचा "धनुष्य " उचलणाऱ्याना गतकाळीं आठवणीच्या "टिकल्या"वाजविण्याची वेळ यंदा आली."मोदीं है तो मुमकीन"म्हणत पाच वर्षे जिल्ह्यात 'कमळ" फुलविणारे "अजित "रॉकेट घेऊन आखाड्यात रंग "भरत आहेत.यंदाच्या दिवाळीत अनेक जण "भावीआमदार"या नावाचे ,उटणे लावून सज्ज झालेत. तशी दिवाळी "सुगी"होईल अशी "आशा"बाळगत मतदार संघात लोक "वाट पाहत आहेत. निवडणूक घेऊन यंदाची दिवाळी आली . चाळीस वर्षा पासून शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे "शिव धनुष्य "घेऊन लोहा कंधार तालुक्यात पर्यायाने जिल्हयात गावोगावी पोहचविणारे लोहेकरांचा राजकीय बॉम्ब अजून पेटलाच नाही. पक्षात एक-"नाथ " सुरसुरी वाजत आहे. काँग्रेसवाल्यानी कड घेतली आह...
Punjab-Maharashtra : पंजाब-महाराष्ट्र बहूराज्यीय सुरेल शास्त्रीय संगीत मैफील गोदा काठी रंगली -NNL

Punjab-Maharashtra : पंजाब-महाराष्ट्र बहूराज्यीय सुरेल शास्त्रीय संगीत मैफील गोदा काठी रंगली -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| नांदेड दिवाळी पहाट २०२४ उपक्रमात, पटीयाला शाम चौरसीया घराण्याचे  व गुरुमित्त संगीत परंपरे जगभर घेवून जाणारे, ख्यातनाम गायक श्री सतनिंन्दर सिंग बोडल यांची, संपुर्णतः शास्त्रीय संगीतावर आधारीत ‘गुरु गोबिंद दा दरबार’ हि सांगितीक मैफिल, बंदाघाट, नांदेड येथे गुरुवारी सायंकाळी रंगली. पावसाची सर येऊन गेल्यावरही, रसिकांनी चांगली दाद देत, यामैफिलीचा आस्वाद घेतला. मैफिलीची सुरुवात सरस्वती रागातील बंदिशीने करण्यात आली. त्यानंतर दरबारी रागातील अजब तेरी दुनिया मेरे मालिक या ओळींनी रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले. माऊली धरती माऊली आकाश गत गत गवलिया अथम प्रकाश, कबीर को स्वामी सबसमान या गुरुग्रंथ साहेब मधील संत कबीर यांच्या शबद नी उत्कट भक्ती रसाचा प्रत्यय रसिकांना दिला. राजा राम माऊली या अनंत भय या शबद मधून सर्वव्यापी सर्वश्रेष्ठ ईश्वर हा अनादी अनंत आहे या सत्याचा पुनर्प्रत्यय रसिकांना दिला. सग...
Atidurgam, Dongri, border village of Waghdari : स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर अतिदुर्गम , डोंगरी, सीमावर्ती वाघदरी गावात मतदान केंद्र मंजूर – NNL

Atidurgam, Dongri, border village of Waghdari : स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर अतिदुर्गम , डोंगरी, सीमावर्ती वाघदरी गावात मतदान केंद्र मंजूर – NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे| पक्का रस्ता नसलेल्या डोंगर -दऱ्यातून पायपीट करून ये-जा करावे लागणाऱ्या तालुक्यातील अतिदुर्गम , डोंगरी, सीमावर्ती वाघदरी गावात स्वतः पायी चालत जावून समस्या जाणून घेऊन विधानसभा निवडणूकी करिता शासनाकडे पाठपुरावा करून मतदान केंद्रास मान्यता मिळवून दिल्याने ग्रामस्थांनी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांचे आभार मानले आहे.               अडीचशे लोकवस्तीचं वाघदरी गाव जलधारा गावापासून पूर्वेस सुमारे 8 किमी अंतरावर आहे. या गावची ग्रामपंचायत कुपटी (बु ) ही येथून सुमारे 20 किमी अंतरावर आहे. येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सोडल्यास इतर कोणतेही शासकीय उपक्रम पोहचले नाहीत. ग्रामस्थ पिण्याचे पाणी दऱ्या - खोऱ्यातील चेलम्यातूनच मिळवून आपली भूक -तहान भागवितात. तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सर्वप्रथम या गावाला पायपीट करत भेट दि...
error: Content is protected !!