Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Bali Pratipada (Diwali Padwa) : बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा) -NNL

Bali Pratipada (Diwali Padwa) : बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा) -NNL

नांदेड, लेख
अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागेदेखील या घटनेचा प्रमुख आधार आहे. बलिप्रतिपदा सणाविषयीचे शास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया.   तिथी :कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा). श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते. इतिहास :बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. स...
Subhash Wankhede : अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सुभाष वानखेडे यांची दिवाळीनिमित्त हिमायतनगर शहरात भेट – NNL

Subhash Wankhede : अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सुभाष वानखेडे यांची दिवाळीनिमित्त हिमायतनगर शहरात भेट – NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर। हादगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार तथा आगामी निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले सुभाष वानखेडे यांनी हिमायतनगर शहरात बुधवारी भेट देऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हादगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले माजी आमदार सुभाष वानखेडे यांनी बुधवारी हिमायतनगर शहरात भेट दिली. येथील महात्मा फुले सभागृहात त्यांनी कट्टर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीती बाबत चर्चा केली. तसेच शहरातील बाजार लाईनमध्ये फिरुन नागरिक व व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. माजी आमदार सुभाष वानखेडे यांच्या आगमनाने हिमायतनगर शहर व तालुक्यातील जुन्या फळीतील शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण झाले असून, विधानसभा निवडणुकीत सुभाष वानखेडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे....
Dr. Raviraj Dudh Kavde : डॉक्टर रविराज दूध कावडे यांची नांदेड उत्तर जिल्हा महासचिव पदी निवड -NNL

Dr. Raviraj Dudh Kavde : डॉक्टर रविराज दूध कावडे यांची नांदेड उत्तर जिल्हा महासचिव पदी निवड -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| वंचित बहुजन आघाडीचे हिमायतनगर तालुक्याचा ढाण्या वाघ, भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी माजी तालुकाध्यक्ष, तालुका संघटक इत्यादी पदावर राहून सामाजिक काम करणारे डॉक्टर रविराज दूध कावडे यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्टींने त्यांची नांदेड उत्तर जिल्हा महासचिव पदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीने आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारास मोठा फायदा होणार आहे. हिमायतनगर तालुका अध्यक्ष पद गेल्यानंतरही डॉक्टर रविराज दूध कावडे यांनी पक्षावर निष्ठा ठेवून कायमस्वरूपी वंचित बहुजन आघाडी तालुक्यांमध्ये कशी वाढेल याकडे लक्ष केंद्रित करून काम सुरु ठेवले. अविरत काम करताना ना पदाचा लोभ, ना मोठेपणाचा आव न करता बाळासाहेबांचा आदेश हीच आपल्या कामाची कार्य दिशा समजून सतत वंचित वंचित बहुजन आघाडी वाढीसाठी झटत राहिले. त्यांच्या याचा कामाची दखल पक्षश्रेष्टींने घेतली ...
voter awareness ; मतदार जनजागृतीसाठी स्वीपच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन – NNL

voter awareness ; मतदार जनजागृतीसाठी स्वीपच्यावतीने विविध उपक्रमाचे आयोजन – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l 16-नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी 87-नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने आतापर्यंत नवनवीन उपक्रम घेण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान जनजागृती करण्याचा संकल्प केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज 31 ऑक्टोबर रोजी जि.प.हायस्कुल मुलांच्या शाळेतील प्रशस्त भव्य मैदानात खुल्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा विविध अशा खुल्या तीन गटात संपन्न झाली. सर्वांसाठी खुला गट वयाच्या अटीशिवाय हा गट होता, दुसरा गट केवळ विद्यार्थी गट तर तिसरा दिव्यांग गट असा होता. प्रत्येक गटात अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. बहुसंख्य स्पर्धकांनी चित्रकला व रांगोळी अशा दोन्ही गटात आपापली कला सादर केली. दोन्ही गटात एकूण 46 स्पर्धकांनी भाग घेतला. नांदेड दक्षिण परिसरासह इतरही परिसरातील स्पर्धक या स्पर्ध...
voters ; मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करा : निरीक्षकांकडून आढावा मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन – NNL

voters ; मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करा : निरीक्षकांकडून आढावा मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व नांदेड विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने सुचवल्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करा.  हिवाळ्यातील छोटा दिवस बघता प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक प्रकाश यंत्रणा असावी, असे आवाहन निवडणूक निरीक्षकांनी आज केले. नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आलेल्या सामान्य ,खर्च आणि पोलीस निरीक्षकांची एकत्रित बैठक आज नांदेड विश्रामगृहामध्ये झाली. या बैठकीला श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे),शेलेंद्रकुमार (भाप्रसे),श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) रण विजय यादव (भाप्रसे) कालु राम रावत (भापोसे),मृणालकुमार दास (आयआरएस ) मयंक पांडे ( आयआरएस), ए. गोविंदराज (आयआरएस) त्यांच्यासोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे,अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर ,ज...
Election Adjudication Officer Dr. Sachin Khalal ; निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ – NNL

Election Adjudication Officer Dr. Sachin Khalal ; निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड l नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 87 नांदेड दक्षिणचे प्रशिक्षण 26 व 27 ऑक्टोबर 2024 रोजी नागार्जुना पब्लिक स्कुल, कौठा,नांदेड येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी  असे एकूण 2 हजार 684 जणांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित होते. परंतु यापैकी मतदान केंद्राध्यक्ष 49, प्रथम मतदान अधिकारी 48 आणि इतर मतदान अधिकारी 104 असे एकूण 201 कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित होते. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस देवून खुलासा सादर करण्यास चोवीस तासांचा अवधी दिला होता. आजपर्यंत मतदान केंद्राध्यक्ष 24, प्रथम मतदान अधिकारी 32 आणि इतर मतदान अधिकारी 63 असे एकूण 119 जणांनी खुलासा सादर केला आहे. अजून  82 जणांनी खुलासा सादर केला नाही. अशा 82 जणांवर तात्काळ गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश नांदेड दक्षिणचे  निवडणूक न...
Sardar Vallabhbhai Patel and Indira Gandhi ; सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी हे देशासाठी आखरी श्वासापर्यंत कार्य करणारे महान नेते- गुणवंत मिसलवाड – NNL

Sardar Vallabhbhai Patel and Indira Gandhi ; सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी हे देशासाठी आखरी श्वासापर्यंत कार्य करणारे महान नेते- गुणवंत मिसलवाड – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | सरदार वल्लभभाई पटेल हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. देश स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर गृहमंत्री पदावर असताना भारतातील संस्थान विलीन करुन देश एकसंघ करुन अखंडता राखली. मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानातून मुक्त होत नव्हता तेंव्हा पोलिस अ‍ॅक्शन प्लॅन आखून हैद्राबाद संस्थानातून मराठवाडा मुक्ती लढ्यासाठीही मोठे योगदान देणारे महान राजकीय नेते होते म्हणून ते पोलादी पुरुष म्हणून ओळखले गेले. पटेल यांनी मुक्त व्यापार, खाजगी मालकी हक्काचे समर्थन करणारे महान राजकीय नेते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. 31 ऑक्टोंबर 2024 गुरुवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता पोलादी पुरुष, देशाचे पहिले गृहमंत्री, भ...
‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये एकता दिनानिमित्त कुलसचिव यांनी दिली शपथ – NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये एकता दिनानिमित्त कुलसचिव यांनी दिली शपथ – NNL

नांदेड, करियर
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. ३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात कुलसचिव डॉ. डी.डी. पवार यांच्या हस्ते या दोन्ही महान व्यक्तीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय संकल्प दिवस व राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली. यावेळी जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह रामदास खोकले, संभाजी धनमने, बबन हिंगे, गजानन जाधव यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते....
I will vote : लोकशाहीला बळकट करीन, मतदान मी करायला जाईन -NNL

I will vote : लोकशाहीला बळकट करीन, मतदान मी करायला जाईन -NNL

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| लोकशाहीला बळकट करीन, मतदान मी करायला जाईन,चला रं मतदान करण्याचा चला.विसरू नको रे मतदानाला.माझे ताई ग चल मतदान कराया जाऊ.अशा एकापेक्षा एक जनजागृती गीताने माहूर येथील बसस्थानक परिसरात झालेल्या कार्यक्रमाने मतदारांचे लक्ष वेधले. नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीपकक्ष नोडल प्रमुख मिनल करणवाल, यांच्या मार्गदर्शानात किनवट विधानसभा मतदार संघ सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतील आणि गटशिक्षणाधिकारी तथा स्वीपकक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांच्या नेतृत्वाखाली मतदार जनजागृती गीते सादर करण्यात आली. मतदारांच्या सोयी सुविधेबद्दल प्रबोधनात्मक गीते सादर करून माहिती देण्यात आली. कार्यक्रमास परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महि...
CIDCO ; नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेते यांना‌ दिवाळी फराळाचे वाटप – NNL

CIDCO ; नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेते यांना‌ दिवाळी फराळाचे वाटप – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने यावर्षी नवीन नांदेड भागातील वृत्तपत्र विक्रेता यांच्या सिडको वृत्तपत्र विक्रेता टिन शेड येथे दस्ती टोपी, पणती दिवे,फराळाचे वाटप‌ करून सन्मान करण्यात आला. वर्षभर पावसाळा हिवाळा‌ उन्हाळ्यात दैनंदिन वृत्तपत्र टाकणाराया सिडको भागातील वृत्तपत्र विक्रेते यांना सामाजिक बांधिलकी जोपासत दिवाळी फराळाचे वाटप सिडको वृत्तपत्र विक्रेते टिन‌शेड येथे 31 ऑक्टोबर रोजी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, उपाध्यक्ष शाम जाधव,सचिव निळकंठ वरळे,सल्लागार अनिल धमणे,तुकाराम सावंत,किरण देशमुख,कार्याध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे,सदस्य सारंग नेरलकर यांच्या सौजन्याने सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेते वाटप करण्यात आला यावेळी जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते रामनाथ दमकोडंवार,शेख‌ सयोदीन,मदनसिंह चौहान,दौलतराव कदम,महिला वितरक वंदना लोणे, यांच्या सह संघटनेचे अध्य...
error: Content is protected !!