Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Method and Significance of Lakshmi Puja : लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आणि महत्त्व -NNL

Method and Significance of Lakshmi Puja : लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आणि महत्त्व -NNL

नांदेड, लेख
आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री  लक्ष्मीपूजन केले जाते. आश्विन अमावास्येचा हा दिवस दीपावलीचा एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; परंतु दीपावलीतील ही अमावस्या शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेप्रमाणेच कल्याणकारी आणि समृद्धिदर्शक आहे. या दिवशी श्री  लक्ष्मीपूजनासोबत अलक्ष्मी नि:सारणही केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावयाच्या कृतीमागील शास्त्र या लेखातून जाणून घेऊया. इतिहास - लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. सण साजरा करण्याचीपद्धत -प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मं...
Dr. Nandkumar Mulmule : डॉ.नंदकुमार मुलमुले यांच्या बहारदार निवेदनाने ‘लक्षदिप हे’ या दिवाळी पहाटच्या पहिल्या कार्यक्रमाने रंगत आणली -NNL

Dr. Nandkumar Mulmule : डॉ.नंदकुमार मुलमुले यांच्या बहारदार निवेदनाने ‘लक्षदिप हे’ या दिवाळी पहाटच्या पहिल्या कार्यक्रमाने रंगत आणली -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांचे दर्जेदार व प्रभावी निवेदन तसेच प्रख्यात गायिका अनुजा वर्तक, सई जोशी आणि नितांशू सावंत या दिग्गज गायकांनी गाजवला दिवाळी पहाटचा पहिला दिवस. ‘लक्षदिप हे’ या कार्यक्रमात दिग्गज कलावंतांनी सादर केलेल्या मराठी रचनांना भल्या पहाटे अभूतपूर्व गर्दी केलेल्या नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा प्रशासन, महापालिका, गुरुव्दारा बोर्ड तसेच नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तपपूर्ती झाल्यानंतर आज १३ वा दिवाळी पहाट बंदाघाटवर मोठ्या उत्साहात सुरु झाला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर तसेच नागरी सांस्कृतिक समिती सदस्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करुन उद्घाटन झाले. त्यानंतर लक्षदिप हे या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांच्या उत्कृष्ट निवेदनाचा आविष्कार असलेल...
Abuse of term in code of conduct : आचार संहिते मध्ये पदाचा गैरवापर करून मातंग समाजाचे घर उठविण्याचा सरपंच, ग्रामसेवकांचा प्रयत्न -NNL

Abuse of term in code of conduct : आचार संहिते मध्ये पदाचा गैरवापर करून मातंग समाजाचे घर उठविण्याचा सरपंच, ग्रामसेवकांचा प्रयत्न -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शहरापासून जवळच असलेल्या तळणी पोस्ट लिंबगाव ता.जि.नांदेड येथील पीडित मातंग कुटुंबियांनी दि.३० पासून स्वगृही मौजे तळणी येथे उपोषण सुरु केले आहे. तळणी येथील व्यंकटी भिवाजी डोम्पले हे वयोवृद्ध मागील ३० ते ४० वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला घर बांधून रहातात. त्यांच्या कुटुंबातील सर्वच्या सर्व व्यक्ती अशिक्षित आहेत. कुटुंबातील एकूण १० ते १२ जणांचे वास्तव्य तेथे आहे. ते रहात असलेली जमीन ही सरकारी आहे. त्यांच्या घराला चिटकून इतर दोन सवर्णाची घरे आहेत. त्यांना धक्का न लावता डोम्पले यांचे घर ऐन आचार संहितेमध्ये उठविण्याचा कट गावातील सरपंच, ग्रामसेवक, माजी सरपंच, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक व कर्मचारी करीत असल्याचा आरोप डोम्पले यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड, पोलीस अधीक्षक,तहसीलदार आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरू...
Lightning strike : ऐन दिवाळीत हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरणकडून विजेचा लपंडाव -NNL

Lightning strike : ऐन दिवाळीत हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात महावितरणकडून विजेचा लपंडाव -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर,अनिल मादसवार| ऐन दिवाळीच्या काळात "महावितरण' कंपनीने ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरु करून जनतेला त्रस्त करून सोडले आहे. सणासुदीच्या तयारीची धांदल सुरू असताना विजेचा सुरू झालेला लपंडाव शहरातून गावाकडे दिवाळी साजरी करण्यासाठी आलेल्या महिला भगिनी, चिमुकले बालक व सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. ऐन दिवाळीत दिवसभर वीज गुल होत असल्याने संशुद्धीच्या काळात महावितरण कंपनीने सुरु केलेली एकाधिकार शाहीपणा बाबत ग्रामीण भागातील नागरीकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यापासून नागरिकांना विजेच्या खेळखंडोब्याला तोंड द्यावे लागत आहे. कधी सकाळी, कधी सायंकाळी अचानक वीजपुरवठा गुल होत आहे. रात्री अपरात्री आणि दिवसभर "महावितरण' नागरिकांना स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. ऐन धामधुमीच्या वेळी विजेचा खेळखंडोबा सुरू झाल्याने नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. ...
Sarsam Avidya abortion case : सरसम अवैद्य गर्भपात प्रकरणातील बोगस डॉक्टरचा अटकपुर्व जामीन औरंगाबाद हायकोर्टाने नाकारला -NNL

Sarsam Avidya abortion case : सरसम अवैद्य गर्भपात प्रकरणातील बोगस डॉक्टरचा अटकपुर्व जामीन औरंगाबाद हायकोर्टाने नाकारला -NNL

क्राईम, छत्रपती संभाजीनगर, नांदेड
हिमायतनगर/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे गैर मार्गाने अवैद्य रित्या गर्भपात करण्यात येत असल्याच्या माहिती वरून आरोग्य विभाग पोलिसांनी केलेल्या कारवाईतील आरोपीवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपी फरार होता, त्याने जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथे अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता परंतु न्यायालयाने सदर आरोपीचा अटकपुर्व जामीन नामंजुर केला पुढे तो छ.संभाजीनगर हायकोर्टात अटकपुर्व जामीना करीता गेला होता परंतु न्यायालयाने तेथेही जामीन नाकारला आहे. सरसम येथिल सुरेखाई नगर भागात अवैद्य रित्य बनावट वैद्यकिय व्यवसायीका कडुन गर्भपात केला जात असल्याची माहिती काहि दिवसा पुर्वी सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी वैभव नखाते यांना मिळाली होती, बनावट वैद्यकिय व्यवसायीकाच्या हालचालीवर लक्ष ठेवुन असतांनाच दि. १३ ऑगष्टला या भागातील अवैद्य गर्भपाताचा संशय ब...
22 new Bolero vehicles : नांदेड पोलीस दलात 22 नविन बोलेरो वाहने दाखल; निवडणूक काळात अतिमहत्वाच्या कामासाठी होणार वापर -NNL

22 new Bolero vehicles : नांदेड पोलीस दलात 22 नविन बोलेरो वाहने दाखल; निवडणूक काळात अतिमहत्वाच्या कामासाठी होणार वापर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दिनांक 29.10.2024 रोजी नांदेड पोलीस दलाकरीता आगामी काळातील अतिमहत्वाचे निवडणुक बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तकरीता नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समिती कडुन वाहने खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने घटकाकरीता 39 नविन वाहने खरेदी करण्यात आले आहेत. सदर 39 वाहनात 22 निओ बोलेरो, 15 स्कॉर्पिओ व 02 महिद्रा थार खरेदी करण्यात आले. सदर वाहने खरेदी करण्याकरीता अभिजित राऊत, जिल्हाधिकारी नांदेड यांनी डिपीडीसी मधुन निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर 22 वाहनाचे पोलीस मुख्यालय नांदेड येथे शहाजी उमाप, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र नांदेड, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांचे हस्ते सदर वाहनांना हिरवा झेंडा दाखवुन पोलीस कर्तव्या करीता रवाना करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन चोपडे, पोलीस निरीक्षक एमटीओ, पोलीस मुख्यालय नांदेड, विजय धोंडगे, राखीव पोलीस निर...
Article on the occasion of Diwali…. Abhyangasnan दीपावलीनिमित्त लेख…. अभ्यंगस्नान -NNL

Article on the occasion of Diwali…. Abhyangasnan दीपावलीनिमित्त लेख…. अभ्यंगस्नान -NNL

नांदेड, लेख
गुढीपाडवा, दिवाळी इत्यादी सणांना ‘अभ्यंगस्नान’ करावे असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या लेखात आपण ‘अभ्यंगस्नान’ म्हणजे काय, त्याची प्रत्यक्ष कृती, त्याने होणारे लाभ, अभ्यंगस्नानात तेल लावण्याचे महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून पहाणार आहोत. अभ्यंगस्नान : अर्थ अ. अभ्यंगस्नान म्हणजे पहाटे उठून डोक्याला आणि शरिराला तेल लावून नंतर कोमट पाण्याने स्नान करणे, आ. शरीराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. इ. पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान वर्षभरातअभ्यंगस्नान करण्याचे दिवस अ. संवत्सरारंभ, आ. वसंतोत्सवाचा प्रारंभ दिवस म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदा, इ. दिवाळीचे तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. अभ्यंगस्...
Extension of time to apply online for 12th examination : बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ -NNL

Extension of time to apply online for 12th examination : बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ -NNL

करियर, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 31 ऑक्टोबर ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. नियमित विद्यार्थ्यांची अर्ज सरल डाटाबेसवरुन ऑनलाईन पद्धतीने त्यांचे उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत. नियमित शुल्क मुदतवाढ तारखा व विलंब शुल्क तारखा तसेच शुल्क, कागदपत्रे जमा करावयाचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस/एनइएफटीद्वारे पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट बुधवार 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत जमा करावयाची आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षा...
Pensioners : निवृत्तीवेतनधारकांनी बँकेत उपस्थित राहून हयातीच्या यादीवर स्वाक्षरी करावी -NNL

Pensioners : निवृत्तीवेतनधारकांनी बँकेत उपस्थित राहून हयातीच्या यादीवर स्वाक्षरी करावी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड जिल्हा कोषागाराअंतर्गत निवृत्तीवेतन घेणारे सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या बँकेत अद्याक्षर निहाय यादी कोषागार कार्यालयाकडून पाठविण्यात आलेली आहे. निवृत्तीवेतन चालू ठेवण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी प्रत्यक्ष बँकेत हजर राहुन यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठयाचा ठसा उमटवावा. पुर्नविवाह तसेच पुर्ननियुक्तीबाबत माहिती लागु असल्यास ती नोंदवावी, असे आवाहन कोषागार अधिकारी नांदेड या पद्धतीशिवाय बायोमॅट्रीक्स पध्दतीने जीवन प्रमाण दाखला देण्याकरिता http://Jeevanpraman.gov.in या संकेत स्थळावर दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सदरील यादीत ज्यांनी स्वाक्...
Voting awareness : विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती -NNL

Voting awareness : विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| मतदानाविषयी जनजागृती करण्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उप‍क्रम राबविण्‍यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता मतदान करण्‍याबाबत आवाहन असलेले स्टिकर्स विविध विभाग प्रमुखांच्‍या वाहनांवर लावण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण घुले, गट विकास अधिकारी शेखर देशमुख, बळवंत, डॉ. पुरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, प्रलोभ कुलकर्णी यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची उ...
error: Content is protected !!