नांदेड| नांदेड जिल्हा कोषागाराअंतर्गत निवृत्तीवेतन घेणारे सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या बँकेत अद्याक्षर निहाय यादी कोषागार कार्यालयाकडून पाठविण्यात आलेली आहे. निवृत्तीवेतन चालू ठेवण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी प्रत्यक्ष बँकेत हजर राहुन यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करावी किंवा अंगठयाचा ठसा उमटवावा. पुर्नविवाह तसेच पुर्ननियुक्तीबाबत माहिती लागु असल्यास ती नोंदवावी, असे आवाहन कोषागार अधिकारी नांदेड
या पद्धतीशिवाय बायोमॅट्रीक्स पध्दतीने जीवन प्रमाण दाखला देण्याकरिता http://Jeevanpraman.gov.in या संकेत स्थळावर दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सदरील यादीत ज्यांनी स्वाक्षरी अथवा अंगठा उमटविलेला नसेल अथवा ऑनलाइन जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल त्यांचे डिसेंबर 2024 चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे कोषागार अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
निवृत्तीवेतन धारकांनी आयकर बचतीचा तपशील सादर करावा
सर्व निवृत्तीवेतन धारकांनी वित्तीय वर्ष 2024-25 करीता केंद्रशासनाच्या निर्देशानुसार नवीन कर प्रणाली ही मुळ करप्रणाली (Default) लागु करण्यात आली आहे. नवीन आयकर प्रणालीनुसार नुसार 7 लक्ष 75 हजार पर्यंत आयकर लागु राहणार नाही. निवृत्तीवेतनधारकांनी आयकर बचतीचा तपशील 20 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
आयकर परिगणना जुन्या करप्रणालीने करण्याकरीता निवृत्तीवेतन धारकांनी त्या आशयाचे विनंती अर्ज व त्यासोबत बचतीचा तपशील, अनुषंगीक सहपत्रे कोषागार कार्यालयात दाखल करणे आवश्यक आहे. असा अर्ज प्राप्त न झाल्यास शासनाच्या निर्देशानुसार नवीन कर प्रणालीद्वारे परिगणना करुन आयकर कपात करण्यात येईल. निवृत्तीवेतनधारकांनी आयकर बचतीचा तपशील 20 डिसेंबर पर्यंत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.