नवीन नांदेड l नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने यावर्षी नवीन नांदेड भागातील वृत्तपत्र विक्रेता यांच्या सिडको वृत्तपत्र विक्रेता टिन शेड येथे दस्ती टोपी, पणती दिवे,फराळाचे वाटप करून सन्मान करण्यात आला.
वर्षभर पावसाळा हिवाळा उन्हाळ्यात दैनंदिन वृत्तपत्र टाकणाराया सिडको भागातील वृत्तपत्र विक्रेते यांना सामाजिक बांधिलकी जोपासत दिवाळी फराळाचे वाटप सिडको वृत्तपत्र विक्रेते टिनशेड येथे 31 ऑक्टोबर रोजी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, उपाध्यक्ष शाम जाधव,सचिव निळकंठ वरळे,सल्लागार अनिल धमणे,तुकाराम सावंत,किरण देशमुख,कार्याध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे,सदस्य सारंग नेरलकर यांच्या सौजन्याने सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेते वाटप करण्यात आला यावेळी जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते रामनाथ दमकोडंवार,शेख सयोदीन,मदनसिंह चौहान,दौलतराव कदम,महिला वितरक वंदना लोणे, यांच्या सह संघटनेचे अध्यक्ष सतिश कदम,दिलीप ठाकूर, बालाजी सुताडे,राजु चोहाण, श्रंगारे सुनिल शिंदे ,अमोल नांदेडकर ,
यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते यांच्यी उपस्थिती होती.