Thursday, July 16

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
old friends robbed us of the joy of playing cricket : दिपावली सनाच्या निमित्ताने जुन्या मित्रांनी लुटला बालपणीच्या मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद -NNL

old friends robbed us of the joy of playing cricket : दिपावली सनाच्या निमित्ताने जुन्या मित्रांनी लुटला बालपणीच्या मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील सर्व मित्रमंडळींनी दिपावली सनाच्या निमित्ताने एकत्र येऊन गेट टुगेदर करून क्रिकेट मित्र खेळण्याचा आनंद लुटला आहे. दोन महिन्यापुर्वी डॉ किरण करेवाड यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत २० वर्षापूर्वी खेळणाऱ्या मैदानावर क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. आणि त्यांच्या आवाहनाला सर्वानी प्रतिसाद देत मैदानाची झालेली दुरावस्था दूर करत साफ सफाई करून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. लहानपणीच्या आठवणीने सर्व मित्रांनी एकत्र येऊन दिवाळीत हा उपक्रम राबवित खेळण्याचा आनंद घेतला आहे. आजच्या स्थितीत प्रत्येक जण मोबाईलला चिटकून बसलेला आहे, मोबाईल वरील इंस्टाग्राम, फेसबुक, वाट्सअप व इतरत्र वाईट व्यसनात अडकलेला आहे. त्यामुळे सर्वाना खेळाचा विसर पडला असून, जे तरून वाईट मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत अशांना खरबा वरील क्रिकेट मित्र गेट-टुगेदर ही संकल्पना आत्म...
Immediately ban the import of cotto : कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालून हमीभावाने कापूस खरेदी करा -NNL

Immediately ban the import of cotto : कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालून हमीभावाने कापूस खरेदी करा -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस महामंडळाला (CCI) हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, सध्या कापसाचे भाव ६५०० ते ६६०० रुपये प्रति क्विंटल असून हा भाव ७१२२ रुपये या हमीभावापेक्षा कमी आहे. बाजा...
Celebrate Diwali : अनाथ व गरजु मुलांना नवीन कपडे देऊन दिवाळी साजरी; युथ फाउंडेशनचा स्त्युत उपक्रम -NNL

Celebrate Diwali : अनाथ व गरजु मुलांना नवीन कपडे देऊन दिवाळी साजरी; युथ फाउंडेशनचा स्त्युत उपक्रम -NNL

नांदेड, उमरखेड, लाइफस्टाइल, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार| आरोग्यदुत म्हणुन विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉ विवेक पत्रे यांच्या युथ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून जंगलव्याप्त बंदीभागातील आकोली, बिटरगाव बु, पिंपळगाव व एकंबा येथे अनाथ व गरीब मुलांना नवीन कपडे वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली. डॉ विवेक पत्रे व संतोष तिरमकदार यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. संबंधित गावातील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करुन अनाथ व गरजु मुलांची निवड करण्यात आली. मुला मुलींच्या वयोगटानुसार चांगल्या प्रतीच्या कपड्यांची अगोदरच खरेदी करण्यात आली‌. दिवाळीच्या दिवशी युथ फाऊंडेशन उमरखेड व निसर्ग संवर्धन समिती ढाणकी च्या सदस्यांनी आकोली, बिटरगाव बु, पिंपळगाव व एकंबा येथे जाऊन मुलांना नवीन कपडे व फराळाचे पदार्थ देऊन लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. यावेळी डॉ विवेक पत्रे, संतोष तिरमकदार, दिपक ठाकरे, प्रा महेश पाटील चंद्रे, गजानन मिट...
Farmar sucide ; कर्जबाजारी व नापिकिस कंटाळून पस्तीस वर्षीय तरुणांची आत्महत्या – NNL

Farmar sucide ; कर्जबाजारी व नापिकिस कंटाळून पस्तीस वर्षीय तरुणांची आत्महत्या – NNL

नांदेड, कृषी
किनवट,परमेश्वर पेशवे। सततच्या नापिकि व कर्जबाजारीला कंटाळून एका पस्तीस वर्षे तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना दिनांक २ नोव्हेंबर रात्री किनवट तालुक्यातील येणाऱ्या इस्लापूर सर्कलजवळील भिशी या गावी घडली आहे. ऐन दिपवाळीच्या सणाची धामधूम चालू असताना भिशी येथील लक्ष्मण रमेश शिरगिरे वय 35 वर्षे या तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पीक कर्जास व सततच्या नापिकीस कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. सदरील तरुणाचे शवविच्छेदन हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. सदरील तरुणाच्या कुटुंबामध्ये पत्नी दोन मुली व एक नऊ महिन्याचे बाळ महिलेच्या पोटात असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी इस्लापूर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद झाल्याची माहिती पुढे येत असून सदरील घटनेचा तपास स.पो.नि. उमेश भोसले यांच्या ...
Politics Special ; अरे शिकून सवरुनी असा कसा गेला वाया..? -NNL

Politics Special ; अरे शिकून सवरुनी असा कसा गेला वाया..? -NNL

नांदेड, लेख
निवडणूक प्रचाराला चांगलीच सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार पाठविण्याची ही निवडणूक आहे. यातून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोक प्रतिनिधी निवडायचे आहेत. काही पढतमुर्खांना हे अजून नीट समजलेले दिसत नाही. त्यांना वाटत असेल मंदिरात पुजारी पाठवायची ही निवडणूक आहे, म्हणून मंदिरात व मठात सनातनी महाराज लोकांना बोलाऊन पुजापाठ करुन निवडणुकीचा प्रचार सुरु करण्यात येत आहे. सर्व पक्षात नाक खुपसून झाल्यावर सर्वांचा जोरदार ठोसा खाऊन लालबुंद झालेले नाक घेऊन आता अपक्ष म्हणून राखीव मतदार संघात उभा राहिलेल्या एका मागासवर्गीय उमेदवाराने सगरोळी येथील एका मंदिरातून व मठातून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. म्हणजे असे केल्याने लोक धार्मिक भावनेतून आपल्यालाच मतदान करतील असा गोड गैरसमज या उमेदवाराचा झाला असावा ! या आपल्या देशात दलितांना शिकण्याचा, लिहिण्याचा, रस्त्यावरुन चालण्याचा आ...
Kakada Aarti at Himayatnagar’s Kalinka Temple : हिमायतनगरच्या कालिंका मंदिरातील काकडा आरतीला महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

Kakada Aarti at Himayatnagar’s Kalinka Temple : हिमायतनगरच्या कालिंका मंदिरातील काकडा आरतीला महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

धार्मिक, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, आकांक्षा मादसवार| मनोकामना पूर्ण करणाऱ्या माता कालिंका मंदिरात कोजागिरी पोर्णिमेपासून सुरु करण्यात आलेल्या काकडा आरतीला पंचक्रोशीतील महिला मंडळींचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. पिढ्यान पिड्या चालत आलेली परंपरा जोपासत काकडा आरतीबरोबर हरिपाठ, विविध कार्यक्रम साजरे केले जात असल्यामुळे श्री कालिंका मंदिर परिसरात सकाळच्या प्रहरी भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू धर्मात देवी - देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केली जाणारी आरती म्हणजे काकडा आरती होय. महिनाभर चालणाऱ्या काकडा आरतीला परिसरातील महिला मंडळी सकाळच्या रामप्रहरी अभ्यंगस्नान करून घरासमोर सडा - सारवन, रांगोळी काढून नवसाला पावणाऱ्या माता कालिंका मंदिरात एकत्र होतात. देवीच्या मूर्तींला काकडयाने ज्योत ओवाळत काकडा आरती केली जाते. तत्पूर्वी कालिंका मातेचा अभिषेक पूजा आणि त्यानंतर धर्मीक गीते गाऊन काकडा आरतीला सुरुवात होत...
Murder case killer arested ; सचिन तिडके प्रकरणातील मारेकरी सिंदखेड पोलीसांच्या जाळ्यात ; लसणवाडीचा यमराज राठोड खुन प्रकरणात -NNL

Murder case killer arested ; सचिन तिडके प्रकरणातील मारेकरी सिंदखेड पोलीसांच्या जाळ्यात ; लसणवाडीचा यमराज राठोड खुन प्रकरणात -NNL

क्राईम, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील ऊसतोड कामगार सचिन शिवाजी तिडके वय ३५ वर्षे रा.भोगलवाडी ता.धारूर याचा ऊस तोडीच्या आर्थिक व्यवहारातुन शेतात नेऊन बळजबरीने दारु पाजून दगडाने तोंड ठेचुन जिवानिशी ठार मारल्याची घटना घडली होती.त्या बाबत आंबाजोगाई पोलिसांनी यातील आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.परंतु प्रकरणातील आरोपी हे पसार झाले असता त्याचा छडा लावत सिंदखेड पोलिसांना पकडण्यात यश आले असून,या कामगिरीने सिंदखेड पोलिसांचे वरीष्ठांने अभिनंदन केले तर नागरिकांतून कौतुक केल्या जात आहे. सदर खुनातील आरोपीतांचा शोध घेण्याकरीता शेख, पोनि स्थागुशा बिड,पडवळ पोनि अंबाजोगाई ग्रामीण जि. बिड यांनी पोस्टे सिंदखेडचे सपोनि रमेश जाधवर यांना फोन वरुन माहीती दिली होती. त्या अनुषंगाने सिंदखेड पोलीसांनी गोपनिय माहीती काढुन प्रकरणातील हकीकत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांना स...
Polling station ; मतदान केंद्राध्यक्ष/अधिकारी यांनी मुक्त आणि निष्पक्ष मतदान घेण्यास सर्व बाबींची पूर्ण माहिती घ्यावी -NNL

Polling station ; मतदान केंद्राध्यक्ष/अधिकारी यांनी मुक्त आणि निष्पक्ष मतदान घेण्यास सर्व बाबींची पूर्ण माहिती घ्यावी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे। मतदान केंद्राध्यक्ष/ अधिकारी म्हणून तुम्ही मतदान केंद्रावरील सर्वात महत्वाचे अधिकारी आहात. मतदान केंद्रावरील प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला पूर्ण कायदेशीर अधिकार आहे. त्याच वेळी, मतदान केंद्रावर होणाऱ्या सर्व कामांसाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार आहात. तुमच्या मतदान केंद्रावर मुक्त आणि निष्पक्ष मतदान सुनिश्चित करणे हे तुमचे प्राथमिक कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे, तुम्हाला निवडणूक घेण्यासंदर्भातील कायदे, प्रक्रिया , यासंदर्भातील आयोगाच्या सूचना आणि निर्देशांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. मतदान केंद्राध्यक्ष (पीआरओ) यांनी त्यांच्याशी संलग्न  इतर मतदान अधिकारी आणि मतदान प्रतिनिधीशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवून त्यांच्यावर सोपविलेली सर्व कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. तुम्ही कोणत्याही मार्गदर्शक तत्वांचे बदल न करता काटेकोरपणे पालन करावे आणि भारत निवडणूक आयोगाच्य...
Happy Diwali ; कलाल,गौड,तेलंग समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने महापालिका कामगारांची दिवाळी गोड – NNL

Happy Diwali ; कलाल,गौड,तेलंग समाज युवा प्रतिष्ठानच्या वतीने महापालिका कामगारांची दिवाळी गोड – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड। सर्वसामान्य कामगारांची दिवाळी देखील गोड व्हावी या हेतूने दरवर्षी काही ना काही उपक्रम राबविणाऱ्या अनंतवार परिवाराने १ नोव्हेंबर रोजी महापालिका कामगारांची दिवाळी गोड केली आहे. दीपावली निमित्ताने राष्ट्रीय कलाल,गौड, तेलंग समाज युवा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा कलाल,गौड, तेलंग समाज युवा प्रतिष्ठान च्या वतीने महानगर पालिकेच्या मनपाच्या प्रभाग क्र 19 व 20 मधील स्वच्छता निरीक्षक किशन अर्जुन वाघमारे व अर्जून बागडी यांच्या सोबत असणारे पुरुष कामगार व महिला कामगार यांचा मिठाई,मानाचा फेटा,शाल, पुष्पहार, साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.तसेच त्यांचे मनोबल वाढवून त्यांच्या सोबत राहण्याचे आश्वासन दिले. सामाजिक कार्यकर्ते सुनील अनंतवार व त्यांच्या संघटनेच्या वतीने अनेक समाज उपयोगी विविध उपक्रम राबविले जातात.त्याच धरतीवर दिवाळीच्या पावन पर्वात कामगार,कर्मचारी व वेगवेगळ्या घटकातील आप...
On the occasion of Prataparao’s Diwali : लोह्यात प्रतापरावांच्या दिवाळीनिमित्त व्यापाऱ्याांशी भेटीगाठी, वीस वर्षापासूनची परंपरा कायम -NNL

On the occasion of Prataparao’s Diwali : लोह्यात प्रतापरावांच्या दिवाळीनिमित्त व्यापाऱ्याांशी भेटीगाठी, वीस वर्षापासूनची परंपरा कायम -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा शहरातील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना दिवाळी पाडवा निमित्ताने माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच त्याच्या भेटीगाठी घेतल्या त्यांचा .व्यापाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत सत्कार केला. गेल्या वीस वर्षा पासून सतेत असो की नसो अखंडपणे दिवाळी पाडवा निमित्ताने शुभेच्छा देत असतात. लोहा शहरातील व्यापारी हातगा‌डेवाले-छोटे दुकानदार यांच्या भेटीगाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिवाळी पाडवा निमित्ताने प्रतापराव आले होते यंदाही त्यांनी दीपावली पाडवा निमिताने शहरात व्यापाऱ्यांशी भेटीगाठी घेतल्या,संवाद साधला विधानसभा निवडणूकीच्या काळ त्यामूळे दिवाळी निमित्ताने लोहा शहरात व्यापाऱ्याच्या भेटीगाठी घेतल्या. यापूर्वी कधीच ते मार्केट मध्ये दिसले नाहीत याची संपूर्ण शहरात खमंग चर्चा सुरु झाली. तर दुसरीकडे गेल्या वीस वर्षापासून पण दुसरीकडे सतेत असो अथवा नसो दरवर्षी ...
error: Content is protected !!