उमरखेड, अरविंद ओझलवार| आरोग्यदुत म्हणुन विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉ विवेक पत्रे यांच्या युथ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून जंगलव्याप्त बंदीभागातील आकोली, बिटरगाव बु, पिंपळगाव व एकंबा येथे अनाथ व गरीब मुलांना नवीन कपडे वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली.
डॉ विवेक पत्रे व संतोष तिरमकदार यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. संबंधित गावातील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करुन अनाथ व गरजु मुलांची निवड करण्यात आली. मुला मुलींच्या वयोगटानुसार चांगल्या प्रतीच्या कपड्यांची अगोदरच खरेदी करण्यात आली.
दिवाळीच्या दिवशी युथ फाऊंडेशन उमरखेड व निसर्ग संवर्धन समिती ढाणकी च्या सदस्यांनी आकोली, बिटरगाव बु, पिंपळगाव व एकंबा येथे जाऊन मुलांना नवीन कपडे व फराळाचे पदार्थ देऊन लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
यावेळी डॉ विवेक पत्रे, संतोष तिरमकदार, दिपक ठाकरे, प्रा महेश पाटील चंद्रे, गजानन मिटकरे, अवधुत मोटाळे, ओम खोपे, अनिल औतकर, पंडित धात्रक पाटील, पंजाबराव पवार, देवकते पाटील, बाळासाहेब खुटलवाड पाटील, डॉ अजित नलावडे, अक्षय वाघमारे, व युथ फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते.