Celebrate Diwali : अनाथ व गरजु मुलांना नवीन कपडे देऊन दिवाळी साजरी; युथ फाउंडेशनचा स्त्युत उपक्रम -NNL
उमरखेड, अरविंद ओझलवार| आरोग्यदुत म्हणुन विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉ विवेक पत्रे यांच्या युथ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून जंगलव्याप्त बंदीभागातील आकोली, बिटरगाव बु, पिंपळगाव व एकंबा येथे अनाथ व गरीब मुलांना नवीन कपडे वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली.
डॉ विवेक पत्रे व संतोष तिरमकदार यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. संबंधित गावातील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क करुन अनाथ व गरजु मुलांची निवड करण्यात आली. मुला मुलींच्या वयोगटानुसार चांगल्या प्रतीच्या कपड्यांची अगोदरच खरेदी करण्यात आली.
दिवाळीच्या दिवशी युथ फाऊंडेशन उमरखेड व निसर्ग संवर्धन समिती ढाणकी च्या सदस्यांनी आकोली, बिटरगाव बु, पिंपळगाव व एकंबा येथे जाऊन मुलांना नवीन कपडे व फराळाचे पदार्थ देऊन लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
यावेळी डॉ विवेक पत्रे, संतोष तिरमकदार, दिपक ठाकरे, प्रा महेश पाटील चंद्रे, गजानन मिट...
