नांदेड| काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अर्धापूर शहरातील व तालुक्यातील केळीच्या सर्व बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

निसर्गाच्या प्रकोपाला बळी पडलेल्या संतप्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी अर्धापूरात रस्ता रोको आंदोलन केले आहे. अर्धापूर येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान व व्यथा उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ यांनी राज्य शासनाला तात्काळ सांगितले आहेत.


वादळी वारे व मुसळधार पावसामुळे काल भोकर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अर्धापूर तालुक्यात प्रामुख्याने केळी व इतर पिकांना प्रचंड फटका बसला. मुदखेड तालुक्यात अनेक ठिकाणी तर भोकर तालुक्यातही काही ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हाधिकारी व संबंधित सर्व तहसीलदारांशी संपर्क साधून मी परिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे आजपासूनच होत आहेत. अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.




