उमरचौक कमानीजवळील नळयोजनेच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यात गाळ माती टाकल्याने रस्ता चिखलात रुतला – NNL

पादचाणाऱ्यांना रस्त्याने ये जा करणे झाले अवघड; नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकात तीव्र नाराजी

हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील मुख्य मार्ग असलेल्या उमर चौक येथील कमानी जवळ नळ योजनेच्या कामासाठी गेल्या पाच दिवसापासून खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. त्याचा रस्त्याच्या खड्ड्यात गाळ माती टाकल्याने रस्ता चिखलात रुतला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या व्यापाऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना व मजुरदार महिला पुरुषांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेकजण येथे घसरून पडून जखमी होत आहेत. या प्रकाराकडे नगरपंचायतीचे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नागरीकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ येथील खोदून ठेवलेल्या रस्ता पूर्वत करून देण्यासाठी नगरपंचायतीने पुढाकार द्यावा अशी मागणी केली जात आहे.

हिमायतनगर शहरात गेल्या पाच सहा वर्षांपासून 19 कोटीच्या पाणीपुरवठा नळयोजनेचे काम सुरू आहे परंतु या योजनेचे काम अजूनही अर्धवट असून, यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. ठेकेदाराने नळ योजनेचे काम करताना काही भागांमध्ये अर्धवट काम ठेवल्यामुळे तसेच जागोजागी नळाची पाईपलाईन लिकेज असल्यामुळे नळ योजनेचे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. एवढेच नाहीत तर पाईपलाईन साठी शहरातील अनेक भागातील सिमेंट रस्ते जागो जागो फोडून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अल्पसा पाऊस पडताच ठिकठिकाणी रस्त्याच्या मध्ये खोदून ठेवलेल्या नाल्यामध्ये पाणी साचून वाहतुकीला आणि पैदान जाणार्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे.

मुख्य बाजारपेठ आणि उमरचौक कमानीजवळ या रस्त्यामुळे अल्पसा पाऊस होताच चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिक व वाहनधारक नळयोजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या नाकर्तेपणा बाबत आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणा बाबत नाराजी व्यक्त करत आहेत. गेल्या पाच दिवसापूर्वी शहरातील उमर चौक भागात नळ योजनेच्या पाईपलाईन कामासाठी पर्यायी व्यवस्था न ठेवता नाली खोदून ठेवली. त्यामुळे या भागातील हातावर पोट असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठे गंडांतर आले आहे. तसेच शाळा सुरू होऊन आठ दिवस झाले शाळेला ये जा करताना या ठिकाणाहून चिमुकल्या बालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा बालकांना शाळेत जाताना घसरगुंडी होऊन जमीनिवर पडावे लागत असल्याने पालक वर्गातून ठेकेदार व नगरपंचायतीच्या नाकर्तेपणा बाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही बाब लक्षात घेता तातडीने येथे खोदून ठेवलेल्या रस्त्यात मुरूम टाकून देऊन चिखल होणार नाही याची काळजी घेत रस्ता पूर्ववत करावा अन्यथा या भागातील नागरिक नगरपंचायतवर ठेकेदाराच्या विरोधात धडक मोर्चा नेण्याच्या तयारीत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button