Kavad yatra ; सहस्त्रकुंड ते हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरापर्यंत निघालेल्या कावड यात्रेत ठिकठिकाणी जोरदार स्वागत -NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने चौथ्या श्रावण सोमवारचे औचित्य साधून सहस्त्रकुंड ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरापर्यंत भव्य अशी कावड यात्रा काढण्यात आली होती. या कावड यात्रेत शेकडो युवकांनी खांद्यावर कावड घेऊन यात्रेत सहभाग घेतला. यावेळी लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर आणि कृष्णा पाटील आष्टीकर यांनी कावड यात्रेला भेट देऊन सर्व युवकांना श्रावण सोमवारच्या शुभेच्छा दिल्या.



दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने चौथ्या श्रावण सोमवरचे औचित्य साधून भव्य पै कावड यात्रा काढण्यात आली होती. रविवारी श्री परमेश्वर मंदिरापासून शेकडो युवक रात्री सहस्त्रकुंड येथे पोचले येथे कृष्णाजी देशमुख यांचा मार्गदर्शन झालं. त्यानंतर सकाळी गंगा स्नान करून शेकडो युवकांनी जय श्री राम… हर हर महादेव नामाचा जयजयकार करत १८ किलोमीटरची पैदल कावड यात्रा काढली. मजल दरमजल करत वडगाव येथे आल्यानंतर कावड यात्रेचे जोरदार स्वागत करून फळाचे वितरण करण्यात आले.


तसेच हिमायतनगर शहरातील उमर चौक भावात पेयजल आणि केळीचे वितरण नागनाथ गुंडेवार यांच्यावतीने करण्यात आले. त्यांनतर श्री परमेश्वर मंदिर परिसरात कावड यात्रा येताच फटाक्याच्या अतिशबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी जय श्रीराम… जय जय श्रीराम… हर हर महादेव… अश्या घोषणांनी हिमायतनगर शहर दुमदुमले होते. कावड यात्रेत सामील झालेल्या कावड धारी युवकांनी श्री परमेश्वर मंदिरात आल्यानंतर कावडीतून आणलेले पैनगंगा नदीचे पाणी श्री परमेश्वराच्या चरणी अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर येथील मंगल कार्यालयाच्या वरील सभागृहात आयोजित धर्मसभेत शेकवड युवकांनी उपस्थित होऊन परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलं.



दरम्यान हदगाव हिमायतनगर तालुक्यचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी देखील श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन शेतकरी, कष्टकऱ्यांच्या सुख समृद्धीची प्रार्थना केली. तसेच येथील श्री परमेश्वर मंदिरात गेल्या वीस दिवसापासून बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या ओम नमः शिवाय नामजप यज्ञात सहभागी घेऊन ओम नमः शिवाय नामजप करून पुण्य प्राप्त केले. यावेळी त्यांच्यासोबत मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, हदगाव तालुकाप्रमुख विवेक देशमुख, संभाराव लांडगे आदींसह हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.






