कंधार/नांदेड। अधिकारी त्यांचे कर्मचारी यांनी मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसाच्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे अनेक वर्षाचासून दूर्लक्षित’ ऐतिहासिक पर्यटन स्थळ” पर्यटकांचे केंद्र बिंदू ठरु शकते.. कंधारच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार व तहसीलदार रामेश्वर गोरे व टीमने प्रत्यक्ष कृतीतून सुरुवात केली आहे. ऐतिहासिक कंधारच्या मूईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली असून दर शनिवारी’ या किल्ल्यावर ‘श्रमदान होणार आहे.


कंधारचा भुईकोट किल्ला पर्यटकांचे आकर्षण ठरवा तसेच या भागात पर्यटक वाढावेत जेणेकरून रोजगार निर्मिती होईल . किल्ल्याचे तसेच परिसरातील धार्मिक स्थळांचे महत्व वाढेल यासाठी स्थानिक पातळीवर’ सामुहिक प्रयत्नांची गरज असते. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मित मोठ्या प्रमाणात होत असते.


कंधार येथील भूईकोट किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेची सुरुवात उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार तहसीलदार रामेश्वर गोरे त्याचे कर्मचारी यांनी शनिवार (२२ मार्च) श्रमदान केले .विविध विभागाचे अधिकारी , नायब तहसीलदार,कर्मचारी पत्रकार , लगतच्या पाच गावाचे सरपंच, सिद्धी विनायक आर्मी अकॅडमीचे विद्यार्थी , ब्रम्हप्रजापती सयंसेवक यांनी सकाळ पासून किल्ल्याच्या आतील परिसर स्वच्छ केला. जमा झालेला कचऱ्यांची विल्हेवाट लावली दर शनिवारी किल्ल्यात स्वच्छतेची मोहिम श्रमदान राबविण्यात येणार आहे किल्यात इतिहास , तेथील वास्तू समोर माहिती फलक , सेल्फी पॉईंट, स्वछतागृह असा विविध सुविधा उभारण्याचा मानस उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी व्यक्त केला.

उन्हाची पर्वा न कारता श्रमदान
स्वतः हुन एखादे कार्य हाती घेतले तर त्याचा शीण येत नाही.वातानुकूलित कक्षात बसणारे व क्वचित श्रमची कामे करणारे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता किल्ला स्वच्छता केली श्रमदान केले त्यामुळे “साथी हात बढाना” म्हणण्या पूर्वीच पाहणाऱ्याचे हात आपोआप स्वच्छता मोहिमेत गुंतले.

नांदेड शहरातील सामाजिक संघटनांना आमंत्रित
कंधार शहर-तालुका तसेच नांदेड शहरातील सामाजिक संघटना यांनी कंधार किल्ला स्वच्छता मोहिमेत श्रमदान करण्यासाठी सहभाग नोंदवावा. जेणेकरून किल्ल्याचे “रूपडे” बदलेल आणि पर्यटक अधिक येतील .तेव्हा दोन्ही लोहा कंधार नांदेड येथील सामाजिक संघटना यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी अरुणा सगेवार यांनी केले आहे.