उपविभागीय अधिकारी संगेवार तहसीलदार गोरे याचा पुढाकार
कंधार/नांदेड। अधिकारी त्यांचे कर्मचारी यांनी मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसाच्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे अनेक वर्षाचासून दूर्लक्षित' ऐतिहासिक पर्यटन स्थळ" पर्यटकांचे केंद्र बिंदू ठरु शकते.. कंधारच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार व तहसीलदार रामेश्वर गोरे व टीमने प्रत्यक्ष कृतीतून सुरुवात केली आहे. ऐतिहासिक कंधारच्या मूईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली असून दर शनिवारी' या किल्ल्यावर 'श्रमदान होणार आहे.
कंधारचा भुईकोट किल्ला पर्यटकांचे आकर्षण ठरवा तसेच या भागात पर्यटक वाढावेत जेणेकरून रोजगार निर्मिती होईल . किल्ल्याचे तसेच परिसरातील धार्मिक स्थळांचे महत्व वाढेल यासाठी स्थानिक पातळीवर' सामुहिक प्रयत्नांची गरज असते. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मित मोठ्या प्रमाणात होत असते.
कंधार येथील भूईकोट किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेची सुरु...
