HomeनांदेडDemonstration and public announcement ; प्लास्टिक वाटर बॉटल क्रशर मशीन वापराचे प्रात्यक्षिक...

Demonstration and public announcement ; प्लास्टिक वाटर बॉटल क्रशर मशीन वापराचे प्रात्यक्षिक आणि पब्लिक अनाउंसमेंट

नांदेड| जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, नांदेड रेल्वे विभागात “प्लास्टिक प्रदूषण संपवा” या विषयावर आधारित 15 दिवसांच्या जनजागृती मोहिम उत्साहात राबविली जात आहे.

या मोहिमे अंतर्गत दिनांक 27 मे, 2025 आणि 28 मे, 2025 रोजी प्रवाशांना प्लास्टिक वाटर बॉटल क्रशर मशीन वापराचे प्रात्यक्षिक आणि पब्लिक अनाउंसमेंट सिस्टमद्वारे नांदेड रेल्वे विभागातील नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद आणि नगरसोल रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यात प्रवाशांनी भरपूर प्रतिसाद दिला. या मोहिमेअंतर्गत रेल्वे स्थानकांवर प्रवाशांन वापरानंतर प्लास्टिक वाटर बॉटल क्रशर मशीन च्या सहाय्याने कशा प्रकारे क्रश करावी याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकांवर पब्लिक अनाउंसमेंट सिस्टमद्वारे या विषयी वारंवार उद्घोषणा करून जनजागृती करण्यात आली.

IMG 20250530 WA0007 Demonstration and public announcement ; प्लास्टिक वाटर बॉटल क्रशर मशीन वापराचे प्रात्यक्षिक आणि पब्लिक अनाउंसमेंट

या सोबतच भारतीय रेल्वे प्लास्टिक नसलेल्या पर्यावरणपूरक कटलरीला प्रोत्साहन देण्याकरिता प्रवाशांन प्रोत्साहित करत आहे. रेल्वे स्थानकांवरील टी स्टोल आणि कॅन्टीन मध्ये प्लास्टिक च्या ग्लास आणि प्लेट ऐवजी प्लास्टिक विरहित पर्यावरणपूरक कटलरीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. इंडिअन रेल्वे केटरिंग आणि टूरीजम कोर्पोरेशन (आयआरसीटीसी) बायोडिग्रेडेबल किंवा प्लास्टिक नसलेल्या कटलरीच्या वापरासाठी मोहीम लवकरच सुरू करणार आहे.

प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी कर्मचारी जागरूकता कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत आणि पर्यावरण संरक्षणासाठी आपली बांधिलकी दर्शवित आहेत. या कार्यक्रमास श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांचे मुख्य मार्गदर्शन लाभत आहे.

ही मोहीम प्रवाशांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि स्वच्छ, हरित भविष्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करते. या मोहिमे अंतर्गत दिनांक 22 मे ते 05 जून दरम्यान नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानकावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments