नवीन नांदेड l राष्ट्रीय FOSSEE पुरस्कार २०२५ (संस्करण ०२) हा FOSSEE प्रकल्प,आय.आय.टी. बॉम्बेचा एक उपक्रम आहे,जो भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या ICT (NMEICT) च्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण मिशन अंतर्गत आयोजित केला जातो.


“राष्ट्रीय FOSSEE अवॉर्ड्स २०२५” चे मुख्य उद्दिष्ट FOSSEE च्या सक्षम करणाऱ्यांचा सन्मान करणे,विविध व्यवसायांमध्ये (संस्था, प्राध्यापक, उद्योगव्यावसायिक, व्यक्ती, इ.) सोबतच मुक्त स्रोत साधनांचा उत्साह साजरा करणे हा आहे,ज्याने स्टेकहोल्डर्सना नवीनतम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आणि धोरण स्वीकारण्यासाठी सक्षम केले आहे.


आय.आय.टी.मुंबई कडून एस. जी. जी. एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेची “कम्युनिटी इम्पॅक्ट अवॉर्ड” साठी निवड करण्यात आलेली आहे आणि या संस्थेतील प्रा.एस.एम. गुढे, सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख, ईलेक्ट्रीकल इंजीनीअरिंग विभाग यांची “उत्कृष्ट योगदानकर्ता पुरस्कार” साठी निवड करण्यात आलेली आहे.


या वर्षीचा राष्ट्रीय FOSSEE पुरस्कार २०२५ (संस्करण ०२) हा पुरस्कार वितरण कार्यक्रम १७ जुलै २०२५ रोजी प्रो. बी. नाग सभागृह, व्हिक्टर मिनेझिस कन्व्हेन्शन सेंटर,आय. आय.टी. (IIT Bombay) मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे. संस्थेला हे दोन पुरस्कार मिळाल्याबद्धाल आयोजक समितीच्या वतीने संस्थेचे व संस्थेतील प्रा.एस.एम. गुढे यांचे अभिनंदन करण्यात आलेले आहे. तसेच दिनांक १७ जुलै २०२५ रोजी पुरस्कार वितरण समारंभात हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थितीत राहण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे.

संस्थेच्या या यशाबद्धल संस्थेचे संचालक डॉ.मनेश ब.कोकरे व प्रा. एस.यम.गुढे यांचे संस्थेचे नियामक मंडळ,विविध अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांचे कडून अभिनंदन करण्यात आलेले आहे.

