सोनारी फाटा/हिमायतनगर, शेख खय्युम| भोकर- हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी गावानजीकच्या टोलनाक्या जवळील एका शेतकऱ्याच्या कोरड्या विहिरीमध्ये पाण्याच्या शोधात आलेला रोजी सकाळी पडला होता. याची माहिती देऊनही तब्बल ५ तासानंतर वनविभागाने त्या रोहिला बाहेर काढून वनाधिवासात सोडले आहे. त्यामुळे बाहेर पाडण्यासाठी तहानेने व्याकुळ झालेल्या रोहिला कासावीस होत धडपडत राहावे लागले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील पाणी पातळी खोल गेली असून, जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात अनेक वन्यप्राणी गावकुशीकडे धाव घेत असून, काही प्राणी शेतातील विहिरीजवळ पाणी शोधात तहान भागविण्यासाठी सैरवैर धावत आहेत. असाच एक रोही जातीचा वन्यप्राणी दिनांक ०५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पाण्याच्या शोधात आला होता. दरम्यान तोल जाऊन भोकर – हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या शेतकरी श्री प्रदीप आनंदराव पवार यांच्या शेतामधील कोरड्या विहिरीमध्ये पडला. येथे रोहीची तहान तर भागलीचं नाही उलट जीव धोक्यात आल्याने बाहेर पाडण्यासाठी तब्बल पाच तास धडपडत होता.

हा प्रकार शेतकऱयांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने वन्यप्राण्याबद्दल आपुली दाखवून वनविभागाला सकाळी 7 वाजता रोही कोरड्या विहिरीत पडल्याची माहिती दिली. मात्र 10,30 वाजेपर्यंत वनविभागाचे कोणतेही अधिकारी इकडे फिरकले नाही. कारण खुद्द वनपरिक्षेत्र अधिकारीच नांदेडला राहून उंटावरून शेळ्या हाकतात. तर वनपाल, वनमजूर व इतर कर्मचाऱयांकडून काय..? अपेक्षा ठेवावी. या उक्ती प्रमाणे कोणीच आले नव्हते तर वनमजूर ४ तासाने घटनास्थळी उपस्थित झाला. तरी एकटा कर्मचारी रोहील कसा बाहेर काढणार असा प्रश्न निर्माण झाला. आपल्या मर्जीप्रमाणे उशिरा वनपाल मेटकर घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रोहीला इतर नागरिक, शेतकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून वनाधिवासात सोडण्यात आले.

दरम्यान पाण्याच्या शोधात आलेल्या रोहि कोरड्या विहिरीतून बाहेर पाडण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर वनविभागाला जाग आली, एकूणच कोरड्या विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाला तब्बल ५ तासानंतर वेळ मिळाल्याने हिमायतनगर वनपरिक्षेत्र विवाहागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याचे अनुभव वन्यप्रेमी नागरिकांना आला आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ अधीकारी कश्या प्रकारे लक्ष देतील आणि येथील अधिकारी , कर्मचाऱ्यांना वन्यप्राण्यांच्या सुरक्षेच्या कर्तव्याची कशी जाणीव करून देत शिस्त लावतील. तसेच पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या वन्य प्रांण्यांची तहान भागविण्यासाठी कश्या प्रकारे सोय करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

याबाबत पोटा बीटचे वनपाल मेटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, आमचे कर्मचारी सकाळी नऊलाचा पोचले आणि रोहिला सर्वानी मिळून सुखरूप बाहेर काढलं आहे. बाहेर निघताच रोहीने धूम ठोकली असून, पाण्याची सोय आहे, सकाळी सकाळी रोही चुकून इकडे आले आणि विहिरीत पडले होते असे त्यांनी सांगितले.