देगलूर,गंगाधर मठवाले। तालुक्यातील मौजे झरी येथील एका शेतकऱ्याची घरासमोरील प्लॉटमध्ये बांधलेली म्हैस दिनांक २४ एप्रिल २५ रोजी अज्ञातांनी चोरून नेली होती. याप्रकरणी शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मरखेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता .या गुन्ह्याचा उकल करण्यात मरखेल पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील झरी येथील एका लोहा येथील इतर दोन आरोपींच्या मुस्क्या मरखेल पोलिसांनी आवळलया आहेत .


या संदर्भात अधिक माहिती अशी की तालुक्यातील मौजे झरी येथील वसंत नागेंद्र भूताळे वय ३२ या शेतकऱ्याची दिनांक २० एप्रिल रोजी सायंकाळी घरासमोर मोकळ्या जागेतील प्लॉटवर बांधलेली म्हैस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या कामी तपास करून पोलिसांनी आरोपी पंढरी तुबकवाड वय २१ रा. झरी, केशव बालाजी लिंबोरे वय २४ (चालक ) रा. इंदिरानगर लोहा, रामेश्वर उर्फ पिंटू बदेवाड वय २७ रा. लोहा हे आरोपी निष्पन्न केले.

यातील तीनही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून म्हैस व गुन्हायात वापरलेली बेलेरो पिकप वाहन असा चार लाख ७० हजाराचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक रवी हुडेकर,उपनिरीक्षक विलास पवार, पो. का. शेख अब्दुल बारी नारायण यंगाले, परमेश्वर बेलकर सचिन गिरे यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास शेख अब्दुल बारी करीत असल्याचे सांगण्यात आले.
