Thirsty Rohi fell into a dry well : तहानेने व्याकुळ रोहि कोरड्या विहिरीत पडला; तब्बल पाच तासाने झाली सुटका
सोनारी फाटा/हिमायतनगर, शेख खय्युम| भोकर- हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी गावानजीकच्या टोलनाक्या जवळील एका शेतकऱ्याच्या कोरड्या विहिरीमध्ये पाण्याच्या शोधात आलेला रोजी सकाळी पडला होता. याची माहिती देऊनही तब्बल ५ तासानंतर वनविभागाने त्या रोहिला बाहेर काढून वनाधिवासात सोडले आहे. त्यामुळे बाहेर पाडण्यासाठी तहानेने व्याकुळ झालेल्या रोहिला कासावीस होत धडपडत राहावे लागले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील पाणी पातळी खोल गेली असून, जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात अनेक वन्यप्राणी गावकुशीकडे धाव घेत असून, काही प्राणी शेतातील विहिरीजवळ पाणी शोधात तहान भागविण्यासाठी सैरवैर धावत आहेत. असाच एक रोही जातीचा वन्यप्राणी दिनांक ०५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पाण्याच्या शोधात आला होता. दरम्यान तोल जाऊन भोकर - हिमाय...
