Homeक्राईमखुनाचे गुन्हयात शिक्षा झालेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात -NNL

खुनाचे गुन्हयात शिक्षा झालेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात -NNL

नांदेड। मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.

दिनांक 02/08/2024 रोजी स्थागूशा चे पोउपनि/मिलिंद सोनकांबळे यांचे पथकास गुप्त बातमीदारा कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, रेल्वेस्टेशन परीसरात पोलीस ठाणे उस्मानपुरा औरंगाबाद शहर हद्यीतील खुनाच्या गुन्हयात शिक्षा झालेला व पॅरोल रजेवर येवुन परत कारागृहात न जाता पळुन गेलेला आरोपी नामे दिनेश अर्जुनसिंह ठाकुर हा रेल्वेस्टेशन, नांदेड येथे आहे अशी माहीती मिळाल्याने स्थागुशाचे पथकाने रेल्वेस्टेशन परीसरातुन फरार आरोपी नामे दिनेश अर्जुनसिंह ठाकुर वय 29 वर्ष रा. जवळा मुराद ता. मुदखेड जि. नांदेड यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणे बारड गुरनं. 67/2023 कलम 224 भा. द. वि. गुन्हयात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि/ मिलींद सोनकांबळे, सपोउपनि/माधव केंद्रे, पोहेकों/रुपेश दासरवार, पोकों/बालाजी यादगीरवाड, ज्वालासिंघ बावरी, मारोती मोरे, चालक हनुमानसिंह ठाकुर, शेख कलीम स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments