किनवट, परमेश्वर पेशवे| बंजारा समाजाचे आराध्य दैवत सद्गुरु श्री सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंतीच्या निमित्ताने ईस्लापूर येथील सद्गुरु सेवालाल महाराज चौक येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


यावेळी सर्व समाज बांधवांनी या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत सद्गुरु क्रांतिकारी सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तर समाज बांधवांच्या वतीने आजच्या या जयंतीच्या निमित्ताने खिचडी वाटप करण्यात आले. ईस्लापूर परिसरातील बंजारा समाजाच्या नवयुवकाच्या वतीने व गोरसेना गोरसिकवाडीच्या वतीने परिसरातील तोटंबा, कचली तांडा,शिवणी, जलधारा ,रिठा, पांगरी ईस्लापूर परिसरातील सर्व वाडी तांड्यां मध्ये भव्य मोटार सायकल रॅली काढून युवकांनी जय सेवालाल च्या घोषणा देत अनेक वाडी तांडे या ठिकाणी दणाणून सोडले.

या भव्य मोटार सायकल रॅली मध्ये शेकडो गाड्यांचा सहभाग होता. तर ईस्लापूर, शिवणी, जलधारा अपारावपेठ परिसरातील अनेक वाडी तांड्यामध्ये आज सेवालाल जयंतीच्या निमित्ताने सेवालाल महाराज मंदिराच्या समोर भोगपूजा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. अन्नदान करण्यात आले, या कार्यक्रमास परिसरातील नायक, कारभारी, डाव, सरपंच , उपसरपंच,पोलीस पाटील, व्यापारी बांधव, पत्रकार बांधव ,महिला, पुरुष, नवयुवक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती .
