नांदेड| दि. २८ जानेवारी रोजी सीटू संलग्न महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटनेचा धडक मोर्चा गांधी पुतळा येथून निघून जिल्हा परिषदेवर धडकला (march hit the Zilla Parishad). यावेळी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन दिले.


मागील चार महिन्याचे मानधन थकीत असल्यामुळे शाळेत मुलांना माध्यनह भोजन पुरविणारे कामगार अडचणीत आले होते. या प्रमुख मागण्यासह इतरही विविध मागण्याचे निवेदनाद्वारे संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आले.

या मोर्चा मध्ये किनवट,भोकर, हिमायतनगर, कंधार,मुदखेड, अर्धापूर,लोहा,धर्माबाद,उमरी, देगलूर, माहूर येथील शालेय पोषण कामगार सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड सरचिटणीस कॉ. अनिल कराळे, कार्याध्यक्ष कॉ.दिगंबर काळे, कोष्याध्यक्ष कॉ.जनार्धन काळे, उपाध्यक्ष कॉ.साहेबराव दहिभाते, सहसचिव कॉ.साधना शिंदे आदींनी केले.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉ. कॉ.मारोती तासके,कॉ.गजानन वडजे, कॉ. बालाजी गऊळकर, कॉ. डुबुकवाड,कॉ.गणेश शिंदे,कॉ. रमेश गायकवाड आदींनी प्रयत्न केले. या मोर्चास सीटू च्या जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार,सीटू राज्य कमिटी सदस्या कॉ.करवंदा गायकवाड, कॉ. दिलीप पोतरे, कॉ. शिवाजी गायकवाड,जमसं जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड, डीवायएफआयचे कॉ. श्याम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड यांनी मोर्चास संबोधित केले. उप शिक्षणाधिकारी बुरकुले आणि धनंजय गुमलवार यांनी लेखी आश्वासन दिले आणि मोर्चाचा समोरोप करण्यात आला.
