HomeकरियरChief Executive Officer Meenal Karanwal ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या...

Chief Executive Officer Meenal Karanwal ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या शाळा व आरोग्‍य केंद्रांना आकस्मिक भेटी – NNL

नांदेड| नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल ह्या नांदेड जिल्‍हयात दौरा करत असतांना ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र व उपकेंद्रांना भेटी देवून संवाद साधतात. दिनांक 28 ऑगस्ट रोजी नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल हदगाव तालुक्यात समन्‍वय सभेच्‍या बैठकांसाठी जात असताना विविध शाळा, अंगणवाडी आरोग्य उपकेंद्रांना आकस्मिक भेटी दिल्या.

IMG 20240901 174808 Chief Executive Officer Meenal Karanwal ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या शाळा व आरोग्‍य केंद्रांना आकस्मिक भेटी - NNL

सीईओ मीनल करनवाल यांच्या या आकस्मिक भेटीमुळे शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या कामकाजाची प्रत्यक्ष स्थिती समजून घेण्यास मदत झाली. चेनापूर तांडा तालुका अर्धापूर येथील शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना आवश्यकतेनुसार शालेय साहित्य वाटप केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा त्यांचा उद्देश असतो. हदगाव तालुक्‍यातील इंद्रप्रस्थ नगर येथील शाळेत भेटीदरम्यान, त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला आणि शाळेतील शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. अंगणवाडी केंद्रात त्यांनी बालकांच्या पोषण आणि शिक्षणाबाबतची माहिती घेतली, तसेच अंगणवाडी सेविकांशी चर्चा केली.

 

IMG 20240901 174748 Chief Executive Officer Meenal Karanwal ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या शाळा व आरोग्‍य केंद्रांना आकस्मिक भेटी - NNL

हदगाव तालुक्‍यातील घोगरी येथील आरोग्य उपकेंद्रात त्यांनी उपलब्ध आरोग्य सेवांचा आढावा घेतला आणि तेथे उपस्थित रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी आरोग्य सेवांच्या गुणवत्तेची तपासणी केली आणि त्यासंबंधी आवश्यक ते निर्देश दिले. त्यांनी पोषण आहार कार्यक्रमाची माहिती घेतली आणि तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांशी चर्चा करून उपकेंद्राची परिस्थिती जाणून घेतली.

IMG 20240901 174631 Chief Executive Officer Meenal Karanwal ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या शाळा व आरोग्‍य केंद्रांना आकस्मिक भेटी - NNL

हदगाव तालुक्‍यातील बैठकीनंतर नांदेडच्‍या परतीवेळी त्‍यांनी भोकर तालुक्‍यातील धावरी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल विचारपूस केली. शाळेतील शिक्षणाच्या स्थितीबद्दल माहिती घेताना त्यांनी शाळेस शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. दौ-या दरम्‍यान प्रवेक्षाधिन आयएएस अधिकारी अनुष्का शर्मा यांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments