नांदेड| येत्या 19/12/24 रोज गुरूवारी सकाळी साडे दाहा वाजता नविन कौठा स्थित लंगर साहेब गुरूद्वारा डेरा येथे उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम, सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ, नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती,वनिता विकास मंडळ महिला ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “फेस्काॅम उत्तर मराठवाडा विभागीय ज्येष्ठ नागरिक महामेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे.
.
या मेळाव्याचे उद्घाटण लंगरसाहेब गुरूद्वार्याचे मुख्य जत्थेदार संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या शुभ हस्ते होणार आहे.मेळाव्यात 3500 ते 5000 ज्येष्ठ नागरिक सहभाग नोंदवितील असा अंदाज आहे.या महामेळाव्यास फेस्काॅमचे नुतन अध्यक्ष सर्वश्री मा.अन्नासाहेबजी टेकाळे मुंबई,मुख्यसचिव चंद्रकांतजी महामुनी पूणे,फेस्काॅमचे माजी अध्यक्ष अरूणजी रोडे साहेब पूणे हे उपस्थित राहणार आहेत.विशेष म्हणजे देश-विदेशातील ज्येष्ठ नागरिक जिवनाचे गाढे अभ्यासक तथा अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघटणेचे माजी अध्यक्ष मा. दिगांबर रावजी चापके साहेब मुंबई हे या मेळाव्याचे खास आकर्षण असणार आहे.
या महामेळाव्यास विशेष अतिथी म्हणून नांदेड जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष तथा विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांचे लाडके जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत साहेब तर प्रमूख अतिथी म्हणून नांदेड जिल्ह्याच्या विधी प्राधीकरण विभागाच्या सचिव तथा ज्येष्ठांप्रती अत्यंत संवेदनशिल असे न्यायमूर्ती दलजित कौर जज्ज आणि नांदेड जि.समाज कल्याण विभागाचे कर्तव्य तत्पर सहआयुक्त मा.शिवानंदजी निमगीरे साहेब यांची उपस्थिती लाभणार आहे.
.
तसेच प्रमूख पाहूणे म्हणून दक्षिण-उत्तरचे नवनिर्वाचित आमदार द्वय उपस्थित राहाणार आहेत.नांदेडचे नवनिर्वाचित खासदार मा.रविंद्रजी चव्हाण साहेब ते हिवाळी अधिवेशनात व्यस्त असूनही उपस्थित राहाण्याचा प्रयत्न करतो असे त्यांनी कळविलेले आहे.तेव्हा या महामेळाव्याचा नांदेड शहर तथा जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महिला-पुरूषांंनी सहभागी होऊन या मेळाव्याचा फायदा घ्यावा असे आवाहान अध्यक्ष डाॅ.हंसराज वैद्य,सचिव प्रभाकर कुंटूरकर,महिला अध्यक्ष डाॅ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार, उपाध्यक्ष माधवराव पवार काटकळंबेकर, ॲड.एम.झेड.सिद्दीकी, डाॅ.सौ.ज्योति डोईफोडे, सौ.निर्मला बार्हाळे, सौ.चारूता देशपांडे,अॅदीपा बियाणी,अनुजा डोईफोडे, सौ.अंजली चौधरी,श्रीमती प्रभा चौधरी, डाॅ.पुष्पा कोकीळ,खान मॅम,रामचंद्र कोटलवार,गिरिष बार्हाळे,सुभाष त्रिपाठी अदिनी केले आहे.