Dr. Hansraj Vaidya : नांदेडमध्ये “उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅमचा ज्येष्ठ नागरिकांचा विभागीय महा मेळावा- डाॅ हंसराज वैद्य -NNL
नांदेड| येत्या 19/12/24 रोज गुरूवारी सकाळी साडे दाहा वाजता नविन कौठा स्थित लंगर साहेब गुरूद्वारा डेरा येथे उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम, सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ, नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती,वनिता विकास मंडळ महिला ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने "फेस्काॅम उत्तर मराठवाडा विभागीय ज्येष्ठ नागरिक महामेळाव्याचे" आयोजन करण्यात आले आहे.
.
या मेळाव्याचे उद्घाटण लंगरसाहेब गुरूद्वार्याचे मुख्य जत्थेदार संत बाबा बलविंदर सिंघजी यांच्या शुभ हस्ते होणार आहे.मेळाव्यात 3500 ते 5000 ज्येष्ठ नागरिक सहभाग नोंदवितील असा अंदाज आहे.या महामेळाव्यास फेस्काॅमचे नुतन अध्यक्ष सर्वश्री मा.अन्नासाहेबजी टेकाळे मुंबई,मुख्यसचिव चंद्रकांतजी महामुनी पूणे,फेस्काॅमचे माजी अध्यक्ष अरूणजी रोडे साहेब पूणे हे उपस्थित राहणार आहेत.विशेष म्हणजे देश-विदेशातील ...
