किनवट, परमेश्वर पेशवे l 263 राज्य महामार्गामध्ये भूसंपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी भिसी व कोल्हारी येथील भूसंपादित शेतकऱ्यांनी भिसी येथील 263 राज्य महामार्गावरच आमरण पोषण सुरू केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तामसा सोनारी हिमायतनगर सवना, जिरोना, भिसी, कोल्हारी कोसमेट मार्गे शिवनीहून निर्मल कडे जाणाऱ्या राज्य मार्ग 220 चे 263 राज्य महामार्गामध्ये रूपांतर झाल्याने या राज्य महामार्गावरील भिसी कोल्हारी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन होऊन भूसंपादीत झालेल्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी 250 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली… मात्र शेतकऱ्यांच्या भूसंपादित झालेल्या जमिनीचा अहवाल शासनाकडे न गेल्याने तब्बल दोन वर्षांपासून भूसंपादित शेतकऱ्यांना भूसंपादित जमिनीचा मावेजा न मिळाल्याने भिशी व कोल्हारी येथील शेतकरी संतप्त झाले आहेत…
या महामार्गामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित झाल्या त्या शेतकऱ्यांनी तात्काळ आम्हाला आमच्या जमिनीचा मावेजा मिळावा म्हणून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज 263 राज्य महामार्गावरी भिशी येथील महामार्गालगत असलेल्या बाळूमामा मंदिराच्या समोरील राज्य महामार्गावरच भुसपांदीत पांडुरंग पालेपवाड, प्रकाश करेवाड, माधवराव हराळे, नंदकुमार गायकवाड,शेषराव शिरगिरे, सूर्यनारायण बालासाहेब जाधव, दिलीप पालेपवाड, विठ्ठल महादू शिरगिरे, अशोकराव पाटील, मोहनराव पाटील, अशा अनेक संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केल्याने या उपोषणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम किनवट उपविभागाचे उप अभियंता वसंत झरीकर, शाखा अभियंता उमाळे रवींद्र, यांनी संतप्त झालेल्या भूसंपादित शेतकऱ्यांची भेट घेतली तसेच तसेच आमदार भीमराव किरामी यांनी भूसंपादित शेतकऱ्यांना फोनवरून संपर्क साधून तुमचा शेतीचा मावेजा मिळून देण्यासाठी मी प्रयत्न करीन असे आश्वासन दिल्याने व उपअभियंता झरीकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर भूसंपादित शेतकऱ्यांनी हे उपोषण मागे घेतले अशी माहिती उपोषण करते पांडुरंग पालेपवाड यांनी यावेळी माहिती दिली. तर उप अभियंता झरीकर यांनी भूसंपादित शेतकऱ्याच्या जमिनीच्या मोबदल्यात अडीचशे कोटी रुपयांला शासनाने मंजुरी दिली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
263 राज्य महामार्गामध्ये भिसी व कोल्हारी येथील पांडुरंग गंगाराम पालेपवाड, प्रकाश दुर्गाजी करेवाड, शांताबाई नारायणराव हराळे, माधवराव सटवाराव हराळे, नंदकुमार धावजी गायकवाड, शेषेराव शिरगिरे,वसंतराव किशनराव शिरसेवाड, प्रेमराव किशनराव शिरसेवाड, लक्ष्मीकांताबाई बापूराव शिरशेवाड, पंडितराव वसंतराव शिरसेवाड, अशोक धावजी गायकवाड, अशोकराव सखाराम पाटील, मोहनराव सखाराम पाटील, विजय धावजी गायकवाड संजय धावजी गायकवाड, रामराव केरबाजी पाटील, शेखु लक्ष्मण शिरगिरे, नागोराव विठ्ठलराव कलूरकर, भगवान नथराम कलुरकर, विठ्ठल महादू शिरगिरे, अनुराधा प्रकाश कदम, सूर्यनारायण बाळासाहेब जाधव, गणपत लक्ष्मण पालेपवाड, दिलीप दत्ता पालेपवाड, सुभाष पालेपवाड यांच्यासह अशा अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या रोडमध्ये भूसंपादित केलेल्या आहेत मात्र या भूसंपादित जमिनीचे मोजमाप होऊन अहवाल शासनाकडे न गेल्याने वरील व इतर शेतकरी भूसंपादित मावेजापासून वंचित आहेत अशी माहिती याप्रसंगी उपोषणकर्त्याकडून मिळाली आहे.
या उपोषणादरम्यान इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील, उपसभापती सूर्यनारायण बाळासाहेब जाधव. भाजपा आदिवासी अनुसूचित जमातीचे प्रदेश अध्यक्ष गोविंद अंकुरवाड, किनवट पंचायत समितीचे माजी उपसभापती कपिल करेवाड, भिशी येथील आनंद नंदनवार, देवराव शिरगिरे, रामा शिरगिरे, सुभाष भट्टेवाड यांनी या उपोषणाला भेट दिली असता या उपोषणाला भूसंपादित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.