farmers in Bhisi Kolhari ; भिसी कोल्हारी येथील भूसंपादित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे l 263 राज्य महामार्गामध्ये भूसंपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी भिसी व कोल्हारी येथील भूसंपादित शेतकऱ्यांनी भिसी येथील 263 राज्य महामार्गावरच आमरण पोषण सुरू केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तामसा सोनारी हिमायतनगर सवना, जिरोना, भिसी, कोल्हारी कोसमेट मार्गे शिवनीहून निर्मल कडे जाणाऱ्या राज्य मार्ग 220 चे 263 राज्य महामार्गामध्ये रूपांतर झाल्याने या राज्य महामार्गावरील भिसी कोल्हारी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन होऊन भूसंपादीत झालेल्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी 250 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली... मात्र शेतकऱ्यांच्या भूसंपादित झालेल्या जमिनीचा अहवाल शासनाकडे न गेल्याने तब्बल दोन वर्षांपासून भूसंपादित शेतकऱ्यांना भूसंपादित जमिनीचा मावेजा न मिळाल्याने भिशी व कोल्हारी येथील शेतकरी संतप्त झाले आहेत...
या महामा...
