उमरखेड। कृषि महाविद्यालय,उमरखेड येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थीनीं कु.वैष्णवी जस्वनील चप्पलवाड व साक्षी नंदकिशोर डुकरे या दोन्ही विद्यार्थिनींचे ॲक्सीस बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापक या पदावर निवड झाली आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला अंतर्गत कॅम्पस प्लेसमेंट मध्ये ॲक्सीस बँकेकरीता विद्यापीठातील एकुण 29 कृषि महाविद्यालयातील 40 विद्यार्थीनी मधून अंतिम मुलाखती नंतर 10 मुलींची निवड करण्यात आली असून त्यात कृषि महाविद्यालय, उमरखेड च्या दोन विद्यार्थीनी वैष्णवी जस्वनील चप्पलवाड व साक्षी नंदकिशोर डुकरे यांची ॲक्सीस बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापक (Asst.Manager) या पदावर निवड झाली आहे.
या विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय कृषी महाविद्यालय उमरखेड, त्यांचे आई – वडील, कृषी विद्यापीठला समर्पित केले आहे. ॲक्सीस बँके तर्फे निवड झाल्यानंतर दोन्ही मुलींच्या पदव्युत्तर शिक्षणाकरिता प्रशिक्षण दिले जाणार आहे . सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर यांना Axis बँकेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक (Asst.Manager) या पदावर नियुक्ती होईल. शिवाजी शिक्षण संस्था द्वारे कृषि महाविद्यालयाचे चेअरमन डॉ.विजयराव माने यांनी महाविद्यालयांच्या या कर्तृत्ववान मुलींबद्दल अभिमान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रिजवान अली खान आणि सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील मुलींच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या यशा मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. श्यामसुन्दर माने, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख डॉ. संदीप हाडोळे, विद्यापीठाच्या स्टुडंट्स फोरम चे प्रमुख डॉ. हर्श्र्वरदन देशमुख, आणि प्लेसमेंट सेल चे अधिकारी श्री रोहित तांबे यांनी राबविलेल्या अभियानामुळे हे शक्य झाले असल्याचे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी यांच्या बदल कृतज्ञता व्यक्त केली.