Agriculture students selection ; कृषी महाविद्यालय, उमरखेडच्या दोन विद्यार्थिनी Axis बँकेच्या असिस्टंट मॅनेजरपदी नियुक्ती -NNL
उमरखेड। कृषि महाविद्यालय,उमरखेड येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थीनीं कु.वैष्णवी जस्वनील चप्पलवाड व साक्षी नंदकिशोर डुकरे या दोन्ही विद्यार्थिनींचे ॲक्सीस बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापक या पदावर निवड झाली आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला अंतर्गत कॅम्पस प्लेसमेंट मध्ये ॲक्सीस बँकेकरीता विद्यापीठातील एकुण 29 कृषि महाविद्यालयातील 40 विद्यार्थीनी मधून अंतिम मुलाखती नंतर 10 मुलींची निवड करण्यात आली असून त्यात कृषि महाविद्यालय, उमरखेड च्या दोन विद्यार्थीनी वैष्णवी जस्वनील चप्पलवाड व साक्षी नंदकिशोर डुकरे यांची ॲक्सीस बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापक (Asst.Manager) या पदावर निवड झाली आहे.
या विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय कृषी महाविद्यालय उमरखेड, त्यांचे आई – वडील, कृषी विद्यापीठला समर्पित केले आहे. ॲक्सीस बँके तर्फे निवड झाल्यानंतर दोन्ही मुलींच्या पदव्युत्तर शिक्षणाकरिता प्रशिक्षण...
