हिमायतनगर| हिमायतनगर शहरातील मिलाप फंक्शन हॉलच्या पाठीमागे मोकळया जागेत दोन वाहनात प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करून 31 गोवंश व 05 म्हशीची पिल्ले (हलगट/वगार) असा एकूण 15 लक्ष 76 हजार रुपये किंमतीच्या गोवंशाची बेकायदेशीर तस्करी करताना हिमायतनगर पोलिसांनी रंगेहात पकडले आहेत.
याबाबत सावचित्तर वृत्त असे कि, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत व मागील गुन्ह उघडकीस आणणेबाबत हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दि.01 जानेवारी 2025 नववर्षाच्या पहिल्या दिवशी हिमायतनगर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असतांना गोपनीय बातमीदार मार्फत मिलाप फंक्शन हॉलच्या पाठीमागे मोकळया जागेत अवैध रित्या गोवंशाची बोलेरो पिकअप मध्ये भरून वाहतुक होत असल्याचे समजले.
सदर माहितीवरून हिमायतनगर येथे सकाळी 08.30 वाजेच्या सुमारास जाऊन पहाणी केली असता इसम नामे शेख जुनेद शेख उस्मान व त्याचा साथीदार (नाव माहीत नाही 22 वर्ष) यांनी संगनमत करून 02 बोलेरो पिकअप एकूण कि. 13 लक्ष रुपयाच्या वाहनमध्ये 31 गोवंश व 05 म्हशीची पिल्ले (हलगट/वगार) एकूण 2 लक्ष 76 रुपये किंमतीच्या गोवंशाची बेकायदेशीर तस्करी करताना पकडण्यास गेले असता शेख जुनेद शेख उस्मान, वय 30 वर्ष पळुन गेला व दुसरा साथीदारास (वय अं. 22 वर्ष) पकडत असताना शासकीय कामात अडथळा करून पळून गेला म्हणुन आरोपीतांविरूध्द गु.र.क्र.01/2025, कलम 132,121(1), 3(5), बी.एन.एस 2023 सह कलम 13, 11 (1) (ड) (ई) (फ) प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध कायदा 1960 प्रमाणे व प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(a),5(b) सह कलम 47(अ), 48,50,56(c) प्राण्यांचे वाहतुक नियम 1978 सह कलम 125 (E) MV ऍक्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील जप्त करण्यात आलेले 36 गोवंश सुरक्षिततेकामी गोशाळेत पाठविण्यात आले आहे. तसेच 02 बोलेरो हे पंचनाम्यांतर्गत ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असून, फरार आरोपीतांचा शोध चालू आहे. या गुन्ह्यात एकूण 36 गोवंश (कि.अं.2,76,000/- रु.) व सफेद रंगाचे दोन बोलेरो पिकअप कि.अं. 13,00,000/- रु. अशी एकूण 15,76,000/-रु. ची मालमत्ता हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केली असून, हि कार्यवाही अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड, खंडेराय धरणे (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, भोकर, सूरज गुरव (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड, शफकत अमना (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, अमोल भगत, पोलीस निरीक्षक, हिमायतनगर पोलीस ठाणे, पोहेका. नागरगोजे, पोहेका. पाटील, पोहेका. आवुलवार, पोहेका. चौदंते यांनी केली आहे. या कार्यवाहीमुळे गोवंशाची कत्तल व वाहतूक करणाऱ्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कार्यवाहीचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.