राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून अर्थात RIMC साठी हिंगोली जिल्ह्यातील हिवरा बु.येथील कु.श्रावणी सारंग गोदरे (स्वामी) हिची निवड झाली आहे. त्याबद्दल तिचा हिंगोलीचे जिल्हाधिकारी मा.अभिनव गोयल साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मा संदिपकुमार सोनटक्के साहेब(EO), गटविकास अधिकारी बोंढारे साहेब, मा.नांदे साहेब(Beo) यांची प्रमुख उपस्थिती होती.
RIMC ही एक अतिशय अवघड परिक्षा समजली जाते. पूर्ण देशातून फक्त 30 विद्यार्थी या परीक्षेमधून निवडले जातात.
यात फक्त 5 मुली निवडल्या जातात. देशातील 5 अव्वल मुलींमध्ये श्रावणीची निवड झाली आहे.
लेखी,तोंडीआणि मेडिकल या तीन टप्प्यामधून ही परीक्षा घेतली जाते. अतिशय हाय स्टँडर्ड असलेली ही परीक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी मिनी UPSC समजली जाते.
RIMC ची स्थापना 1922 मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने केली आहे. RIMC मध्ये निवड होणारी महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतची श्रावणी ही केवळ दुसरी मुलगी आहे . यापूर्वी गंगाखेडची अदिती विष्णू शिंदे हिची निवड झाली होती.
श्रावणीच्या यशात i can coching classes सातारा येथील अदिती गावंडे मॅडम आणि सुखोई अकॅडमी दिल्ली येथील दीप्ती मॅडम, धर्मेंद्र सर , भाटी सर यांचा महत्वाचा वाटा आहे.
मागील चार वर्षापासून तिची तयारी सुरू असल्याचं तिचे वडिल सारंग स्वामी सर सांगतात. अभ्यासाचे काटेकोर नियोजन, सातत्याने वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास केल्यामुळ हे यश मिळाल्याचे तिची आई सारिका स्वामी ह्या मोठ्या अभिमानाने सांगतात. एवढ्या कमी वयात तिच्यातील प्रगल्भता आणि गणित विषयातील अवघड उदाहरणे सोडविण्याची विलक्षण हातोटी तिला इतरांपेक्षा वेगळं करते.
सैन्यदलात उच्चपदस्थ अधिकारी व्ह्यायच हे ध्येय उराशी बाळगून श्रावणीचा प्रवास सुरू झाला आहे.
श्रावणी स्वामी हिच्या या निवडी बद्दल अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय सचिव प्रवक्ते वैजनाथ स्वामी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.