नांदेड l शहराचे वैभव असलेल्या जुना मोंढा येथील टॉवरची घड्याळ अनेक दिवसांपासून बंद आहे ही घडी दुरुस्त करावी अशी मागणी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्तांकडे केली आहे.
परंतु या मागणीची दखल घेण्यात न आल्याने पत्रकार किशोरकुमार वागदरीकर आता मुख्यमंत्र्यांसह नगर विकास मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. नांदेड शहरातील जुना मोंढा परिसरात असलेले टॉवर हे शहराचे वैभव होते. शहर परिसराचे सुशोभीकरण होण्यापूर्वी हे टॉवर हातावर पोट असणाऱ्या हमाल मजुरांचे अश्रय स्थान होते.
याच ठिकाणी ते घटकाभर विश्रांती घेत परंतु कालांतराने नांदेड शहरात तथा जुना मोंढा परिसराचा विकास झाला परंतु या विकासात मात्र नांदेडचे वैभव असलेल्या टॉवरची दुरावस्था झाली. टॉवरच्या चारही बाजूने मोठ-मोठ्या दगडांचा रस्ता बनवण्यात आला यामुळे पावसाळ्यात अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असून काही चिरेबंद दगडे निघाली असून खड्डे झाली आहेत. त्यातच टॉवरची घडी मागील अनेक वर्षापासून बंद आहे ही घडी दुरुस्त करावी अशी मागणी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे देखील केली आहे. त्याबरोबरच समाज माध्यमांमध्ये देखील त्यांनी हा विषय पोटतिडकीडे ने मांडला आहे.
परंतु या मागणीची दखल घेण्यात न आल्याने आता ते थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह नगर विकास मंत्र्यांची ता. 8 जानेवारी रोजी भेट घेणार असून टॉवरच्या घड्याळसह विविध शहरातील मूलभूत सुविधा,समस्या संदर्भाने निवेदन देणार असल्याची माहिती आहे. दरम्यान पत्रकार किशोर कुमार वागदरीकर हे शहरातील समस्या संदर्भात एवढी सहजता दाखवीत असल्याने विविध क्षेत्रातील मंडळी त्यांचे कौतुक करत असून त्यांच्या मागण्या पूर्ण होवो अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.
घंटा नाद पुन्हा ऐकू येईल-वागदरीकर नांदेड शहरातील जुना मोंढा परिसरातील घडी ही हमाल, मापाडी मजूरदारांची वेळ सांगणारी होती. या घडीच्या घंटा नादावरून हे मजूर कामाची सुरुवात तथा काम बंद करू करत होते.
तर याच घडीच्या वेळेवरून अनेक जण आपली कामे करत असत त्यामुळे नांदेडचे वैभव असलेली ही घडी सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच घडीचा घंटा नांद पुन्हा नांदेडकरांना ऐकू येईल असा विश्वास पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी व्यक्त केला आहे.