Nanded Tower clock ; नांदेड टॉवरची घडी पोहोचणार नगर विकास मंत्रालयात – NNL
नांदेड l शहराचे वैभव असलेल्या जुना मोंढा येथील टॉवरची घड्याळ अनेक दिवसांपासून बंद आहे ही घडी दुरुस्त करावी अशी मागणी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्तांकडे केली आहे.
परंतु या मागणीची दखल घेण्यात न आल्याने पत्रकार किशोरकुमार वागदरीकर आता मुख्यमंत्र्यांसह नगर विकास मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. नांदेड शहरातील जुना मोंढा परिसरात असलेले टॉवर हे शहराचे वैभव होते. शहर परिसराचे सुशोभीकरण होण्यापूर्वी हे टॉवर हातावर पोट असणाऱ्या हमाल मजुरांचे अश्रय स्थान होते.
याच ठिकाणी ते घटकाभर विश्रांती घेत परंतु कालांतराने नांदेड शहरात तथा जुना मोंढा परिसराचा विकास झाला परंतु या विकासात मात्र नांदेडचे वैभव असलेल्या टॉवरची दुरावस्था झाली. टॉवरच्या चारही बाजूने मोठ-मोठ्या दगडांचा रस्ता बनवण्यात आला यामुळे पावसाळ्यात अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असून काही चिरेबं...
