Himayatnagar police brought cattle theft : हिमायतनगर पोलीसानी आणली गोवंश चोरी उघडकीस;15 लक्ष 76 हजारांची मालमत्ता हस्तगत -NNL
हिमायतनगर| हिमायतनगर शहरातील मिलाप फंक्शन हॉलच्या पाठीमागे मोकळया जागेत दोन वाहनात प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करून 31 गोवंश व 05 म्हशीची पिल्ले (हलगट/वगार) असा एकूण 15 लक्ष 76 हजार रुपये किंमतीच्या गोवंशाची बेकायदेशीर तस्करी करताना हिमायतनगर पोलिसांनी रंगेहात पकडले आहेत.
याबाबत सावचित्तर वृत्त असे कि, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत व मागील गुन्ह उघडकीस आणणेबाबत हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दि.01 जानेवारी 2025 नववर्षाच्या पहिल्या दिवशी हिमायतनगर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असतांना गोपनीय बातमीदार मार्फत मिलाप फंक्शन हॉलच्या पाठीमागे मोकळया जागेत अवैध रित्या गोवंशाची बोलेरो पिकअप मध्ये भरून वाहतुक होत असल्याचे समजले.
सदर माहितीवरून हिमायतनगर येथे सका...
