नांदेड| येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या नारायणी जिमचे उद्घाटन नांदेड उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. नांदेड येथील काबरानगर रिंग रोडवर (अंबिका मंगल कार्यालय समोर) नारायणी जिम सुरू करण्यात आली आहे.
विनायक पाथरकर यांच्या पुढाकरातून सुरू केलेली जिम नांदेडकरांसाठी वरदान ठरणार आहे. या जिम मध्ये आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञान असलेल्या मशनरी व व्यायामाचे साहित्य उपलब्ध करण्यात आले असून नांदेडच्या जिम धारकांना ही चांगली नामी संधी उपलब्ध झाली आहे असे आमदार कल्याणकर म्हणाले. आधुनिक पद्धतीची एकमेव जिम म्हणून नारायणी जिमचा नावलौकिक करावा लागेल असे आ. कल्याणकर म्हणाले.
प्रारंभी आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते फीत कापून जिम चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी युनियन बँकेचे शाखाधीकारी योगेश महाजन, नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, सराफा सुवर्णकार संघाचे अध्यक्ष सुधाकरराव टाक,माजी नगरसेवक जी.नागय्या,माजी विरोधी पक्ष नेते धोंडू पाटील, हरिदास भट्टड, तुलसीदास भुसेवार, सुभाष बल्लेवार, दातत्रेय पईतवार, श्रेयसकुमार बोकारे, सुरेश मुक्कावार, दीपक भोरे, राजीव कुलथे, अरून मैड, अनिल धानोरकर, प्रा.राजेश मुखेडकर, दत्ता लिबोने, धनंजय उमरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नारायणी जिम चे संस्थापक विनायक पाथरकर यांनी प्रास्ताविक करून जिम चे महत्व आणि जिमच्या बाबतची माहिती दिली. आ कल्याणकर व प्रमुख पाहुण्यांचे विश्वजित पाथरकर, नितीन कांबळे, सचिन कांबळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.