नांदेड| दिवाळी आणि छट निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी लातूर-पुणे मार्गे आणि नांदेड-विजयवाडा विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. त्या बाबतचा तपशील खालील प्रमाणे असल्याची माहिती रेल्वे विभागाने जारी केली आहे.
नांदेड-पनवेल विशेष गाडीची एक फेरी : गाडी क्रमांक 07685 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 02 नोवेंबर, 2024 शनिवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 16. 15 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11.15 वाजता पोहोचेल.
पनवेल – नांदेड विशेष गाडी ची एक फेरी : गाडी क्रमांक 07686 पनवेल ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी दिनांक 03 नोवेंबर, 2024 रविवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी 12.35 वाजता सुटेल आणि पुणे, दौंड, लातूर, परळी, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 06.45 वाजता पोहोचेल.
विजयवाडा-नांदेड विशेष गाडी ची एक फेरी : गाडी क्रमांक 07020 विजयवाडा ते हजूर साहिब नांदेड विशेष गाडी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी विजयवाडा येथून सायंकाळी 18.40 वाजता सुटेल आणि गुंटूर, सत्तेनापल्ली, सिकंदराबाद, निझामाबाद मार्गे हजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12.00 वाजता पोहोचेल.
नांदेड पनवेल नांदेड विशेष गाडी मार्गे मनमाड, कल्याण हि रद्द करण्यात आली आहे : गाडी क्रमांक 07625 / 07626 नांदेड – पनवेल – नांदेड विशेष गाडी मार्गे मनमाड – कल्याण हि विशेष गाडी दिवाळी-छट निमित चालविण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे हि गाडी तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे.