नवीन नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सह पतसंस्थेच्यी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन गोविंदराव हंबर्डे यांच्या अध्यक्षते खाली २० सप्टेंबर रोजी संपन्न झाली यावेळी सभासदांना १२ लाख रूपये कर्ज वाटप व लांभाश १० टक्के देण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सह पतसंस्थेच्यी २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० सप्टेंबर रोजी स्वारातीम विद्यापीठ येथे चेअरमन गोविंद हंबर्डे, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, प्रारंभी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक शिवराम लुटे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गेल्या २० वर्षापासून नां. जि .म.स.बॅक संचालक शिवराम लुटे यांच्या पॅनलचे पतसंस्थेवर वर्चस्व आहे. नांदेड जिल्ह्यातील एक नावाजलेली व नावलौकिक मिळवलेली व स्व भांडवलावर असलेली ही पतसंस्था आहे.
सभासदांना १२ लाख कर्ज वाटप करण्यात येणार असून, १० टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला तर पतसंस्थेच्या वतीने झेरॉक्स सेंटर माध्यमातून ही चांगल्या प्रकारे नफा झाला असून, ही पतसंस्था सभासदाना १० लाख कर्जाला विमा संरक्षण देत असल्याचे सांगितले, पतसंस्थेच्या पारदर्शक कारभारा बाबत सभासदांनी संचालक मंडळ यांच्ये अभिनंदन केले आहे.
या सभेला उपाध्यक्ष काळबा हनवंते,सचिव संजयसिंग ठाकूर, कोषाध्यक्ष अभय जोशी, व संचालक मंडळ यांच्या सह १५० सभासद उपस्थित होते. यावेळी सचिव संजयसिंग ठाकूर यांनी सभेचे नफा तोटा ताळेबंद पत्रक वाचन केले.सभासदांचा दृष्टीने अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात येत असल्याने सभासद यांनी संचालक मंडळ यांच्ये आभार मानले.