Venkatesh Balaji Temple : हिमायतनगर वाढोणाच्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात ब्राम्होत्सवाची अभिषेक घटस्थापनेच्या झाली सुरुवात – NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढोणा शहरातील पुरातन कालीन भगवान श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा गुरुवारी तारीख ०३ रोजी सकाळी ४ वाजता अभिषेक महापूजेनंतर घटस्थापनेणे ब्रम्होत्सवाला सुरुवात झाली असून, दहा दिवसाच्या पर्वकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पुरोहित कांतागुरु आणि गजुगुरु वाळके यांनी दिली असून, भाविक भक्तांनी ब्रम्होत्सव काळात व्यंकटेश बालाजीचे नित्यनेमाने दर्शन घेऊन पुण्य पदरी पाडून घ्यावे असे आवाहन त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.

प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. या तिथीपासून शारदीय नवरात्री उत्सव आणि ब्रम्होत्सवाची सुरुवात झाली आहे. हिमायतनगर वाढोणा येथील व्यंकटेश बालाजी मंदिरात अनादिकाला पासून चालत आलेल्या परंपरेनुसार पहिल्या दिवशी घटस्थापना गुरुवार दिनांक ०३ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजता मंत्रोचार वाणीत भगवान बालाजीचा महाअभिषेक महापूजा, आरती नंतर करण्यात आली आहे. शेकडो वर्षापासून या मंदिरात भगवान व्यंकटेश बालाजी, विष्णू, ब्रम्हदेव, महिषासुर मर्दिनी, स्कंद कार्तिके, श्रीगणेश यासह अन्य देवी – देवतांच्या काळ्या पाषाणातील मनमोहक मुर्त्या स्थापित आहेत. शेवटच्या दिवशी म्हणजे विजयादशमी रोजी बालाजी मंदिरात येथील मानकरी सुभाष पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येते. त्यानंतर संध्याकाळी शहरातून निघालेली विजया दशमीच्या मिरवणुकीतील हजारो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. या भक्तांना मंदिराचे पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या हस्ते बुंदीच्या स्वरूपात तीर्थ – प्रसाद वाटप केला जातो.

याच श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात मंदिरात महिषासुर मार्दीनीची मूर्ती असल्यामुळे ब्राम्होत्सव पर्वकाळात बालाजी मंदिर दर्शनाला अनन्य साधारण महत्व प्राप्त होते. या काळात येथील महिला मंडळाच्या वतीने शारदा देवीची प्रतिष्ठापना करून नऊ दिवसाचा उत्सव साजरा केला जातो. या काळात महिला मंडळाच्या वतीने फुगडी, लेझीम, लंगडी, गायन, रांगोळी, भजनाच्या स्पर्धा घेतल्या जातात. शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला माता शारदा देवीची मिरवणूक मुख्य रस्त्यावरून काढून विसर्जन केली जाते. संपन्न झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करून कार्यक्रमाची सांगता होते अशी बालाजी मंदिरातील ब्रम्होत्सवातील कार्यक्रमाची रूपरेषा आहे.

व्यंकटेश बालाजीचे मंदिराचा इतिहास यादव कालीन बालाजीचे मंदिर

शहरातील पश्चिम बाजूस शेकडो वर्षापूर्वीपासून यादव कालीन भगवान व्यंकटेश बालाजीचे मंदिर आहे. नंतरच्या काळात मंदिराची दुरुस्ती झाल्यामुळे सदर मंदिर हे पुरतान दिसत नसले तरी मंदिरातील मुर्त्या व बांधकामाच्या दगडी शिळावरून ते दिसून येत आहे. बालाजीचे मंदिर हे पूर्वाभिमुख असून, पूर्व – पश्चिम ३३ फुट ४ इंच लांबी, तर दक्षिण – उत्तर रुंदी २७ फुट ६ इंच आहे. मंदिराचे बांधकाम ४ फुट उंचीच्या जोत्यावर करण्यात आलेले असून, मंदिराच्या उभारणीत मोठ मोठ्या दगडांच्या शीला लावलेल्या आहेत. मंदिराचे सभामंडप ७ बाय १४ फुटाचे असून, गर्भग्रह भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी अंतरालासाठी दोन्ही बाजूने एक एक प्रवेश द्वार ठेवण्यात आले आहे. मंदिराचे शिखर अर्धगोलाकार असून, त्यावर लहान शिखर आहे. मंदिराचे प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती कोरण्यात आलेली असून, परंपरेनुसार मंदिराची देखभाल कांतागुरु व गजुगुरु वाळके हे करतात.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button