Swaratim University ; स्वारातिम विद्यापीठ सह कर्मचारी पतसंस्थेची 23वी सर्वसाधारण सभा संपन्न सभासदांना १२ लाख कर्ज तर १० टक्के लाभांश देणार – NNL
नवीन नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सह पतसंस्थेच्यी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन गोविंदराव हंबर्डे यांच्या अध्यक्षते खाली २० सप्टेंबर रोजी संपन्न झाली यावेळी सभासदांना १२ लाख रूपये कर्ज वाटप व लांभाश १० टक्के देण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सह पतसंस्थेच्यी २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २० सप्टेंबर रोजी स्वारातीम विद्यापीठ येथे चेअरमन गोविंद हंबर्डे, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, प्रारंभी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक शिवराम लुटे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गेल्या २० वर्षापासून नां. जि .म.स.बॅक संचालक शिवराम लुटे यांच्या पॅनलचे पतसंस्थेवर वर्चस्व आहे. नांदेड जिल्ह्यातील एक नावाजलेली व नावलौकिक मिळवलेली व स्व भांडवलाव...
