नांदेड। लोकशाहीचा चौथा स्तंभ सांभाळणाऱ्या पत्रकारांनी आपले स्वतःचे आरोग्य सांभाळुन निरपेक्ष पत्रकारीता करण्यासाठी सज्ज राहावे, असे प्रतिपादन *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी केले. महानगरपालिकेतील स्थायी समिती सभागृहात आज मंगळवारी दि.०७.०१.२०२४ रोजी *पत्रकार दिनाच्या स्नेहमिलन कार्यक्रमात* ते बोलत होते. मराठी वृत्तपत्राचे जनक *आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर* यांना आणि दर्पन दिनाला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर मनपा आयुक्तांनी आज पत्रकाराशी संवाद साधला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त सुप्रिया टवलारे, लेखाधिकारी श्रीनिवास चन्नावार, सहा.संचालक नगररचनाकार पवन आलुरकर, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे तसेच जेष्ठ संपादक, वरिष्ठ पत्रकार, वार्ताहार, जिल्हा प्रतिनिधी, विविध वाहिण्यांचे प्रतिनिधी, समाज माध्यमातील प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.
६ जानेवारी १८३२ या दिवशी बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरु केले. हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणुन साजरा केला जातो. १८३२ ते २०२५ हा जवळपास पावणे दोनशे वर्षाचा काळ.. मराठी पत्रकारितेन या काळात अनेक स्थित्यंतर अनुभवली. स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी, अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारी ते आत्ताची २४ बाय ७ पत्रकारिता.. हातातल्या मोबाईवर वेळोवेळी येणारे अपडेटस यामुळे पत्रकारिता बदलत राहीली आहे. या बदलांशी स्वतःला जुळवुन घेतांना माध्यमांना किंबहुना पत्रकारांना अनेक आव्हांनाचा सामना करावा लागत असुन अधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन या आव्हानावर मात करण्याची अपेक्षा यावेळी आयुक्तांनी व्यक्त केली. यासोबतच पत्रकारांनी रात्र-दिवस कार्यरत असतांना आपल्या आरोग्याची सुध्दा काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
यावेळी जेष्ठ पत्रकार विजय जोशी, अब्दुल सत्तार, गोविंद करवा, मुन्तजिब यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना पत्रकारांसाठी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात जागेची मागणी केली तसेच मागील काळात पत्रकार समुहासाठी गृहनिर्माण प्रकल्पासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असुन तो मार्गी लावण्याची सुचना यावेळी करण्यात आली असता त्यास आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवुन योग्य त्या कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच पत्रकार म्हणुन आपला प्रशासनावर योग्य तो अंकुश असावा या संदर्भात प्रशासकीय अधिकारी म्हणुन माझे समर्थन आपणास आहे, परंतु पत्रकारांनी सुध्दा प्रशासनाशी सहकार्याची भुमिका ठेवुन लोकाभिमुख कार्यात प्रशासनासोबत सलोख्याची भुमिका ठेवावी अशी माफक अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी, या कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले. त्यांनी उपस्थित पत्रकारांना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करुन बाळशास्त्री जांभेकरांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वास नमण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जनसंपर्क विभागाचे सुमेध बनेसोडे यांनी तर आभार प्रदर्शन उपआयुक्त सुप्रिया टवलारे यांनी केले.