नांदेड। ”१००डे टीबी कॅम्पियन” कार्यक्रमा अंतर्गत दि.०८/०१/२०२५ रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या शिवाजी नगर दवाखान्यामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. माहेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते निक्षय वाहन xray मशीनचे अनावरण करण्यात आले.
यावेळी आरोग्य उपायुक्त श्री स.अजितपालसिंघ संधू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिठे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.मोहम्मद बदीओदिन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.मोहम्मद बदीओदिन यांनी दिनांक ०७ डिसेंबर २०२४ पासून सुरू झालेल्या १०० डे टीबी कॅम्पियन कार्यक्रमातून दिनांक २४ मार्च २०२५ रोजीच्या जागतिक वर्ल्ड टीबी डे पर्यंत शहरात सर्व भागात जसे मनपाचे सर्व दवाखाने, शाळा,महाविद्यालय, वृद्धाश्रम, विजभट्टी कामगार, कारागृह, रेल्वे हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, भाजीपाला मार्केट अश्या विविध ठिकाणी आरोग्य शिबिराचे नियोजन करून सदरील *निक्षय वाहनाद्वारे xray* सेवा दिली जाईल व यातून नांदेड शहर टीबी मुक्तीकडे वाटचाल करेल असे सांगितले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनपा आयुक्ततथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी निक्षय वाहनचे अनावरण करून नांदेड शहरात टीबी विभागा मार्फत सदरील वाहन शहरातील नियोजित केलेल्या कॅम्प च्या जागी जाऊन तेथेच प्रत्यक्ष रुग्णाचे xray करून निदान या निक्षय अंबुलन्स द्वारे केले जाईल,असे सांगताना या अभियानातून नांदेड शहर टीबी मुक्त करण्याचा मानस त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
या कार्यक्रमास शिवाजी नगर दवाखाना येथील डॉ.सुप्रिया पंडित,डॉ.प्रांजली जोशी, डॉ.विजया राठोड, डॉ.सचिन सिंगल, डॉ.चांडोलकर तसेच आरोग्य विभागाचे हेमराज वाघमारे, उत्तम कराड, आळणे,बालाजी चव्हाण व टीबी विभागाचे सर्व कर्मचारी, परिसरातील सर्व आशा वर्कर कार्यक्रमास उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टीबी विभागाचे बालाजी साखरे,पांडुरंग दुमाणे, राम सोळंके, कृष्णा भुसेवाड, ज्ञानेश्वर पगारे, विवेकानंद हलीकर, विरंगना वाघमारे,दिलीप लांडगे,रवींद्र कुमार कावडे, विश्वास साबणे,श्रीपाद मारकवार यांनी परिश्रम घेतले.