लोहा| ऊर्ध्व मानार लिंबोटी धरणाच्या बुडीत क्षेत्रात विशेषतः लातूर जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे पाण्याचा येवा वाढला त्यामुळे शनिवारी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले .त्यातून नदीपात्रात १ हजार ४१३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे. नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन लिंबोटी धरणाचे सहायक पूर नियंत्रक अधिकारी रानवळकर यांनी केले आहे.


लोहा -कंधार-अहमदपूर या तालुक्यासाठी वरदान ठरलेले लिंबोटी धरण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात प्रतापरावांच्या पाहिल्या आमदारकीच्या टर्म मध्ये धरण पूर्ण झाले तर माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या काळात धरणातून पाणी सोडण्यात आले १९८२ मध्ये राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री डॉ शंकरराव चव्हाण यांच्या काळात तत्कालीन आ ईश्वरराव भोसीकर यांच्या काळात धरणाचे भूमिपूजन झाले होते. आज हेच धरण लोहा कंधार सह अहमदपूर उदगीर पालम भागातील जनतेची तहान भागवित आहे.लातूर -अहमदपूर ,बीड जिल्ह्यात पाऊस झाला की येवा वाढतो .


२२ तारखेला धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता २४ तास नदी पात्रात त्यातून पाण्याचा विसर्ग झाला.१.६५ दलघमी एवढे पाणी या काळात नदी पात्रात सोडण्यात आले .अहमदपूर भागात पाऊस झाल्याने शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले त्यातून १४१३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आले. आगस्ट महिन्यात धरणाची पाणीपातळी 95.टक्के इतकी स्थिर ठेवायची असल्याने वारंवार धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे त्यामुळे नदीकाठावर असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे असे इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात येत आहे.


ऊर्ध्व मानार पाटबंधारे लोहा उपविभागाचे अभियंता श्री फुलारी , अभियंता ए एम राजपूत कार्यालयातील सुनेगाव तलावाचे बीटप्रमुख श्री बी.एम.खेडकर सहाय्यक पुर नियंत्रण अधिकारी रानवळकर कालवा निरीक्षक श्री एस.ई.बारोळे हे लक्ष ठेवून आहेत उपविभागीय अधिक्षरी अरुणा संगेवार ,तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



