नांदेड| शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आदेशाने Operation flush out राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक 19/08/2024 चे 22.00 ते 20/08/2024 चे 04.00 वाजे पावेतो नांदेड शहरातील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑल आऊट ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलेले होते.


सदर ऑल आऊट ऑपरेशनमध्ये नांदेड शहरातील वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ, इतवारा व नांदेड ग्रामीण हद्दीत राबविण्यात आलेले आहे. ऑलआऊट ऑपरेशनकामी 02 अपर पोलीस अधीक्षक, 02 उपविभागीय पोलीस अधीकारी, 28 इतर पोलीस अधिकारी व 143 पोलीस अंमलदार, 02 आरसीपी प्लाटुन यांची नेमणूक करण्यात आलेली होती. सदर ऑलआऊट ऑपरेशनमध्ये नाकाबंदी करुन संशयीत वाहन चेक करणे, पाहिजे फरारी आरोपी यांचा शोध घेवुन अटक करणे, सर्वप्रकारचे वॉरंट बजावणे, गंभीर गुन्हयातील आरोपीतांना चेक करणे, सराईत गुन्हेगार चेक करणे, या बाबत आदेशीत करण्यात आले होते.



त्या अनुषंगाने नांदेड शहरातील पोलीस स्टेशन हद्दीमधील अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे (47), मालाविषयक गुन्हयातील (58) आरोपींना चेक करण्यात आलेले आहे. तसेच (13) इसमांना वॉरंट तामील करण्यात आलेले असून पो.स्टे. हद्दीतील महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करुन (266) संशयीत वाहने चेक करण्यात आलेले आहेत.


तसेच सदर ऑलआऊट दरम्यान मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कलम 55 म.पो.का.प्रमाणे सहा महिन्यांसाठी नांदेड जिल्हयातून हद्दपार केलेले इसम नामे 1. राजु माधवराव केंद्रे, वय 47 वर्ष, रा. शेल्लाळी ता. कंधार जि. नांदेड 2. सत्यम राजु केंद्रे, वय 22 वर्ष, रा. शेल्लाळी ता. कंधार जि. नांदेड यांना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील सपोनि संकेत दिघे यांचे पथकाने पो.स्टे. भाग्यनगर हद्दीत ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदाप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच पोस्टे इतवारा यांनी त्यांच्या हद्दीतील एका आरोपीस ताब्यात घेवुन त्याचेकडुन 01 खंजर जप्त करुन आर्मस अॅक्टची कार्यवाही केली आहे. सदरची कामगीरी ही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.



