Appeal : “भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत”जमीन विक्रीसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

लातूर/नांदेड| दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन आदिवासी कुटुंबांना शेत जमीन मिळण्यासाठी “भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजना” राबविण्यात येते.

या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील (प्राधान्याने किनवट व माहूर तालुका) येथील शेती मालकांनी आदिवासी विभागाच्या 28 जुलै, 2021 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जमीन विकण्यासाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, ता.किनवट, जि. नांदेड येथील सुविधा केंद्रामध्ये 10 जुलै, 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत परिपूर्ण अर्जाचा भरणा करावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02469-222015 किंवा poitdp.kinwat-mh@gov.in या ई-मेल आयडीवर संपर्क करण्याचे आवाहन नांदेड येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जेनित चद्रा दोन्तुला यांनी केले आहे.

भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत 04 एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा 02 एकर बागायती (ओलीताखालील) जमीन शासनामार्फत शेती मालकांकडून खरेदी करून पात्र भूमिहीन आदिवासी कुटुंबाला उपलब्ध करून दिली जाते, असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button