Homeआरोग्यDistrict Health Officer Dr Sangeeta Deshmukh : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता...

District Health Officer Dr Sangeeta Deshmukh : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख मॅडम यांची उप जिल्हा रुग्णालय बिलोली भेट

नांदेड| जिल्हातील दहा तालुक्यात हत्तीरोग दुरीकरण औषध उपचार मोहीम दि. 10 फेब्रुवारी पासून राबविण्यात येत आहे. आज दि. 12 फेब्रुवारी रोजी बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील शाळेमध्ये सकाळी विद्यार्थी यांना गोळ्या खाऊ घालण्यात आल्या.

काही विद्यार्थी यांना मळमळ, उलट्या होऊ लागल्याने लगेच उपजिल्हा रुग्णालय बिलोली येथे दाखल करण्यात आले.मा. राहुल कर्डीले साहेब जिल्हाधिकारी नांदेड, मा. मिनल करणवाल मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांना मा. डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी माहिती दिली.

लगेच संध्याकाळी मा. डॉ. संगीता देशमुख यांनी उप जिल्हा रुग्णालय बिलोली भेट दिली. सर्व बालकांची आस्थेवाईकपणे चौकशी व विचारणा केली. सर्व बालकाची तबेत चांगली आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही व तेथील डॉक्टर यांना योग्य तो उपचार करण्यास डॉ. देशमुख यांनी सांगितले. या गोळ्या संपूर्णपणे सुरक्षित आहेत. जेवण करून घावे.

IMG 20250213 070732 District Health Officer Dr Sangeeta Deshmukh : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख मॅडम यांची उप जिल्हा रुग्णालय बिलोली भेट

यावेळी डॉ गणपत वाडीकर तालुका आरोग्य अधिकारी बिलोली, जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक सत्यजीत टिप्रेसवार, उपजिल्हा रुग्णालय बिलोली येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, हत्तीरोग कर्मचारी गंगाधर तोटावार, कुंडलवाडीचे आरोग्य सहाय्यक मुंडे,गणेश जगताप आदी कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments