HomeनांदेडAgnimallanna : श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम; नडकुड्यात अग्निमल्लन्ना रथोत्सव उत्साहात संपन्न

Agnimallanna : श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम; नडकुड्यात अग्निमल्लन्ना रथोत्सव उत्साहात संपन्न

निजामाबाद, एस नविनकुमार| जिल्ह्यातील नडकुडा येथे दि. १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान सुरू असलेल्या भव्य श्री श्री श्री अग्निमल्लन्ना जत्रोत्सवात दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पारंपरिक रथोत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हजारो महिला-पुरुष भाविकांनी रथाला पुष्पमाला अर्पण करून, नारळ फोडत नवसपूर्ती केली. हलगीच्या तालावर मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालत रथोत्सवाची शोभायात्रा काढण्यात आली. या दरम्यान भाविकांनी श्री श्री श्री अग्निमल्लन्ना देवाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

IMG20260121184134 01 Agnimallanna : श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम; नडकुड्यात अग्निमल्लन्ना रथोत्सव उत्साहात संपन्न
oplus_0

सामूहिक रथोत्सवाचे दृश्य अविस्मरणीय ठरले. फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले होते, तर “श्री श्री श्री अग्निमल्लन्ना की जय” या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

IMG20260121183744 01 Agnimallanna : श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम; नडकुड्यात अग्निमल्लन्ना रथोत्सव उत्साहात संपन्न
oplus_0

या पावन जत्रोत्सवात सहभागी होण्यासाठी परिसरासह दूरदूरच्या गावांतून भाविकांनी हजेरी लावली. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम ठरलेला हा रथोत्सव नडकुड्याच्या धार्मिक परंपरेतील एक महत्त्वाचा अध्याय ठरला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments