नांदेड| महर्षी कपील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिमायतनगर व संतकवी दासगणू शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरी येथे शुक्रवार 6 जून 2025 रोजी सकाळी 10 वा. “शिवराज्यभिषेक” दिवस साजरा करण्यात येणार आहे.


विद्यार्थ्यामध्ये चांगले विचार रूजविण्यासाठी पंचपरिवर्तनवर आधारीत नागरीक कर्तव्य आणि शिष्टाचार या विषयावर हिमायतनगर येथे कमलाकर दिक्कतवार तर उमरी येथे मारोती संबोड हे मार्गदर्शनपर प्रबोधन करणार आहेत. शहरातील विद्यार्थी, नागरीकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जे. एल. गायकवाड यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमाचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळयास 350 वर्ष पुर्ण झालेले आहेत. दिनांक 6 जून 2025 रोजी राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळयाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या व्हिडिओ संदेशांद्वारे कार्यक्रमांचा शुभारंभ होणार आहे. राज्याभिषेक सोहळयाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी, माजी विद्यार्थी, स्थानिक उद्योजक यांच्या सहभागातून नाविन्यता प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे शुक्रवार 6 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हयातील प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने प्रशिक्षणार्थ्यांनी, पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 साली रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. त्यांच्या राज्याभिषेकास 350 वर्ष पुर्ण झालेले आहेत. त्यांचे प्रेरणादायी जीवन आजही समाजाला प्रेरणा देते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत प्रवेश प्रक्रीया सुरु
प्रवेश इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन
गुरु गोबिंदसिघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme)ऑगस्ट-2025 सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया 15 मे 2025 पासुन ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे. येथे प्रवेश घेणाऱ्या इच्छूक उमेदवारांनी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज व प्रवेश शुल्क भरावेत. नंतर नजीकच्या शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन अर्ज निश्चीत करणे आवश्यक आहे. अर्ज निश्चीतीकरण केल्यानंतरच उमेदवारांना व्यवसायाची निवड करता येणार आहे.
तरी नांदेड जिल्हयातील युवक व युवती ( उमेदवारांनी ) यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज व निश्चितीकरण करावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे. श्री गुरु गोबिंदसिघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे प्रवेश सत्र ऑगस्ट 2025 साठी एकुण 23 व्यवसायाच्या 40 तुकडया अंतर्गत 864 जागा करीता प्रवेश उपलब्ध आहेत. ज्यामध्ये 8 व्यवसाय 10 वी उत्तीर्ण / अनुत्तीर्ण पात्रतेवर तर 15 व्यवसाय 10 वी उत्तीर्ण पात्रतेवर प्रवेशासाठी उपलब्ध आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट-2025 सत्रासाठीची प्रवेश प्रक्रिया 15 मे 2025 पासुन ITI Admission Portal: https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर सुरु करण्यात आलेली आहे. यासाठी दहावी उत्तीर्ण अथवा अनुर्तीर्ण इच्छुक विद्यार्थी अर्ज करु शकतात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दती व माहीती पुस्तीका ऑनलाईन स्वरुपात संकेतस्थळावर Download Section मध्ये पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.
राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एकुण 83 प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांची एकुण वार्षिक प्रवेश क्षमता जवळपास एक लक्ष ऐवढी आहे. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जादा मागणीचे तसेच अधिकचे तंत्रज्ञानावर आधारित 652 नवीन अभ्यासाच्या तुकडया समाविष्ठ करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था आधुनिकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्यात आलेली आहे. विविध प्रवर्गात उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनाही लागु करण्यात आलेली आहे.
दहावी अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता करण्यात येते. तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आयटीआय मधुन व्यावसायिक शिक्षण पुर्ण करुन त्वरित रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.