Homeक्राईमillegal sand mining : अवैध वाळू उपसा प्रकरणी तहसील कार्यालय नांदेडची कारवाई

illegal sand mining : अवैध वाळू उपसा प्रकरणी तहसील कार्यालय नांदेडची कारवाई

नांदेड़| जिल्हाधिकारी नांदेड राहुल कर्डिले उपविभागीय अधिकारी नांदेड डॉक्टर सचिन खल्लाळ तहसीलदार नांदेड संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली 2 जुनं रोजी सकाळी 05 वाजता तहसील कार्यालय नांदेडचे महसूल पथकाने मार्कंड येथील गोदावरी नदीपत्रात गस्त करत असताना दोन इंजीनास आठ तराफे जाळून नष्ट केले.

सदरील कार्यवाहीत नायब तहसीलदार स्वप्निल वामनराव दिगलवार ,ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी ,मनोज सरपे ,दिलीप पवार ,माधव पाटील ,गोपीनाथ कल्याणकर मंडळ अधिकारी राजेंद्र शिंदे, तसेच महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांच्यासोबत मार्कंड येथील गोदावरी नदीपत्रात गस्त करत असताना दोन वाळू उपसा करणारे इंजिन व आठ तराफे आढळून आले. पथकाने आठ तराफे जाळून नष्ट केले व दोन इंजिन जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरात जमा करण्यात आले.

सदरील कार्यवाहित ११ लक्ष रुपयाची इंजिन व तराफे जप्त करण्यात आले आहेत या कार्यवाहीत वेळी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस अमलदार गवळी हे उपस्थित होते. इंजिन मालकांबाबत माहिती मिळू शकली नसून मालकाचा शोध लागताच याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments